होंडा हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ब्रँड आहे. नुकतंच या कंपनीची Honda Elevate SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. ही आलिशान गाडी भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या काळात उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.होंडा Elevate ही कार कंपनीच्या जागतिक स्मॉल कार प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामध्ये मिड साईझची सेडान देखील येते. लवकरच होंडा आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये स्टॅटिक डिस्प्लेसाठीची वाहने डिलर्सपर्यंत पोहोचत आहेत.
होंडा Elevate
जुलै महिन्यात एलिव्हेटचे जागतिक स्तरावर लॉन्चिंग करण्यात आले. एलिव्हेट आपली पॉवरट्रेन सिटीसह शेअर करते. यामध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन जे १२१ बीएचपी पॉवर आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. किंवा हे इंजिन ७-स्टेप CVT शी जोडले जाऊ शकते. एलिव्हेटचे मॅन्युअल इंजिन हे १५. ३१ प्रतिलिटर तर CVT १६.९२ किमी प्रतिलिटर धावते. वास्तविक-जगातील आकडेवारी थोडी वेगळी असावी अशी अपेक्षा आहे. होंडा एलिव्हेटचा आकार तिची स्पर्धक असणाऱ्या ह्युंदाई क्रेटा सारखीच आहे. त्याची लांबी ४,३१२ मिमी, रुंदी १,७९० मिमी आणि उंची १,६५० मिमी टिकी आहे. एलिव्हेटचा व्हीलबेस २,६५० मिमी इतका आहे. एलिव्हेटला २२० मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. याबाबतचे वृत्त autocarindia ने दिले आहे.
होंडा एलिव्हेट फीचर्स
होंडा एलिव्हेट ही SV, V, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये उपलब्ध होणार आहे. एंट्री लेव्हल असणाऱ्या SV मॉडेलमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, १६ उंचच स्टील व्हील्स आणि ड्युअल फ्रंट एअरबॅग्स मिळतात. एलिव्हेटच्या ZX ला १०.२५ इंचाचा टचस्क्रीन, ६ एअरबॅग्स सिंगल पेन सनरूफ, ADAS, ८ स्पिकर्स, सॉफ्ट टच डॅशबोर्ड आणि ऑटो-डिमिंग इंटीरियर मिरर मिळतो. एलिव्हेटमध्ये असे काही फीचर्स मिळतात.
होंडा एलिव्हेटचे टेस्ट ड्राइव्ह लवकरच सुरू होईल. उपलब्ध माहितीनुसार, याची किंमत ११ लाखांपासून सुरू होऊ शकते. होंडा एलिव्हेट ह्युंदाई क्रेटा अनुच्या अलीकडेच लॉन्च झालेल्या किआ सेलटॉस फेसलिफ्टला टक्कर देईल. ज्यात जास्त फीचर्स आणि डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. होंडा कंपनी आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही Elevate ४ सप्टेंबरला लॉन्च करणार आहे.