होंडा हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ब्रँड आहे. काही दिवसांपूर्वी या कंपनीची Honda Elevate SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये SUV सेगमेंट सर्वात जास्त लोकप्रिय होताना दिसून येत आहे. तब्बल सहा वर्षानंतर कंपनी आपले नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. होंडा कार्स इंडिया आज भारतात नवीन Elevate SUV लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, किया सेलटॉस, ग्रँड विटारा आणि टोयोटा हायरायडर सारख्या देशातील काही सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही मॉडेल्सना टक्कर देणार आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा होंडा कंपनीचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. कंपनी हं या नवीन एसयूव्हीच्या किंमतीची तसेच उपलब्धतेची घोषणा करणार आहे. नवीन होंडा एलिव्हेट होंडाची भारतातील तिसरी कार आहे. ज्यात होंडा अमेझ आणि होंडा सिटीचा समावेश आहे. ही कार जून महिन्यात जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली होती. तसेच याचे प्री-बुकिंग देखील सुरु आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
होंडा एलिव्हेटमध्ये होंडा सिटीचे सारखेच इंजिन असणार आहे. कारमध्ये L15B १.५ लिटरचे i-VTEC पेट्रोल इंजिन मिळेल. ही कार ६-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दोन ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध असेल. होंडा एलिव्हेट एकूण ७ सिंगल कलर व्हेरिएंटमध्ये सादर केली जाईल. त्यामध्ये प्लॅटिनम व्हाईट पर्ल, लुनर सिल्व्हर मेटॅलिक, ऑब्सिडियन ब्लू पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक आणि फिनिक्स ऑरेंज पर्ल या रंगाचा समावेश असेल.
या सात रंगांशिवाय, यामध्ये ३ ड्युअल टन कलर दिले जाणार आहेत. जे केवळ टॉप एन्ड व्हेरिएंटसाठीच असणार आहेत. यामध्ये क्रिस्टल ब्लॅक पर्ल रूफसह फिनिक्स ऑरेंज पर्ल, क्रिस्टल ब्लॅक पर्ल रूफसह प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि क्रिस्टल ब्लॅक पर्ल रूफसह रेडियंट रेड मेटॅलिक या तीन रंगांचा समावेश असणार आहे. होंडा एलिव्हेट ही होंडा सेन्सिंग फीचरसह येते. जी ड्रायव्हरला अपघातापासून वाचण्यास मदत करण्यासाठी विंडशिल्डवर वाइड अँगल कॅमेराचा वापर करते.