Honda Elevate Launched in India: होंडा कार्स इंडिया ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. होंडा कंपनीने आपली Elevate ही एसयूव्ही अखेर भारतात लॉन्च केली आहे. होंडा एलिव्हेटचे जून महिन्यात जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली होती. तसेच याचे प्री-बुकिंग देखील सुरु होते. एलिव्हेट ही पाच सीटर एसयूव्ही असून SUV SV, V, VX आणि ZX या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. होंडाच्या या नवीन एलिव्हेटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Honda Elevate: फीचर्स

होंडा एलिव्हेटच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १०.२५ इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, सात इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर आणि सिंगल पेन सनरूफ यासारखे फीचर्स वापरकर्त्यांना मिळणार आहेत. तसेच यात स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, होंडा कनेक्ट आणि होंडा सेन्सिंग ADAS टेक अशी फीचर्सदेखील मिळतात.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Renault Triber Discount On 63,000 Rupees In January 2025 Check Specification & Features Details
नवीन कार घेण्याचा विचार करताय? या ७ सीटर कारवर मिळत आहे मोठी सूट; आत्ताच खरेदी केल्यास होईल ६३,००० रुपयापर्यंतचा फायदा
remarkable Performance of Auto Industry in 2024
अडीच कोटी वाहनांची वर्षभरात विक्री; ‘सियाम’ची आकडेवारी; २०२३ च्या तुलनेत १२ टक्क्यांची वाढ
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

हेही वाचा : Car Sales In August 2023: भारतीय बाजारपेठेत Maruti Suzuki चा धडाका, ऑगस्टमध्ये केली दीड लाखांपेक्षा जास्त वाहनांची विक्री

इंजिन

होंडा एलिव्हेटमध्ये होंडा सिटीसारखेच १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११९ बीएचपी आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन अनुक्रमे १५.३१ kmpl आणि १६.९२ kmpl च्या ARAI प्रमाणित इंधन कार्यक्षमतेसह ६ स्पीड मॅन्युअल किंवा सात स्पीड CVT युनिटसह जोडण्यात आले आहे.

कोणाशी स्पर्धा करणार?

होंडा एलिव्हेट ह्युंदाई क्रेटा, किआ सेलटॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर, फोक्क्सवॅगन Taigun आणि स्कोडा Kushaq यांच्याशी स्पर्धा करणार आहे.

Story img Loader