होंडा हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ब्रँड आहे. काही दिवसांपूर्वी या कंपनीची Honda Elevate SUV कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये SUV सेगमेंट सर्वात जास्त लोकप्रिय होताना दिसून येत आहे. तब्बल सहा वर्षानंतर कंपनी आपले नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. २०१७ मध्ये कंपनीने WR-V हे शेवटचे मॉडेल लॉन्च केले होते. याचे बुकिंग आधीपासूनच सुरू असून, किंमतीच्या घोषणेनंतर लवकरच डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. उद्या होंडा आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही लॉन्च करणार आहे. जुलै महिन्यात एलिव्हेटचे जागतिक स्तरावर लॉन्चिंग करण्यात आले होते.
Honda Elevate: स्पेसिफिकेशन्स
होंडा एलिव्हेट ग्राहकांना आपल्या सेगमेंटमधील सर्वात चांगली अशी उंची आणि ग्राउंड क्लिअरन्स देते. ही C3 एअरक्रॉसच्या ५११ लिटरच्या क्षमतेनंतर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे बूट स्पेस देखील देते. एलिव्हेटमध्ये होंडा सिटीमध्ये असलेले आणि टेस्ट केलेले १.५ लिटरचे VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनसह जोडणुयात आले आहे. हे इंजिन १२१ पीएस आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. २०२६ पर्यंत एलिव्हेट या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर केले जाण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त cardekho ने दिले आहे.
अपेक्षित किंमत
होंडा एलिव्हेटची किंमत सुमारे ११ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवातीची किंमत तिच्या प्रतिस्पर्धी असलेल्या मॉडेल्सच्या किंमतीप्रमाणेच असू शकते. ऑफरवर एकच पॉवरट्रेन असल्याने त्याचे टॉप एन्ड व्हेरिएंट त्याच्या स्पर्धकांना मात देऊ शकते. जे अनेक इंजिन पर्यांयसह लॉन्च केले जाते.
फीचर्स
होंडाने एलिव्हेटमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, १७ इंचाचे अलॉय व्हील्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्लेसह १०. २५ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ७ इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इलेक्ट्रिक सनरूफ आणि वायरलेस चार्जर यांसारखे फीचर्स दिले आहेत. एलिव्हेट एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्स, रिअर पार्किंग कॅमेरा, लेन वॉच कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि हिल होल्ड असिस्टसह ESP फिचर मिळते. यात ADAS हे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. ज्यात अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट अशा फीचर्सचा समावेश होतो.
कोणाशी स्पर्धा करणार ?
होंडा एलिव्हेट ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, फोक्सवॅगन Taigun, Citroen C3 एअरक्रॉस, Skoda Kushaq आणि एमजी Astor या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.