Honda Cars India बाजारात Honda Elevate सादर करण्याच्या तयारीत आहे. होंडा सिटी आणि होंडा अमेझ नंतर कार निर्मात्याचे हे तिसरे मॉडेल असेल. होंडा एलिव्हेट हे जागतिक मॉडेल असले तरी ते प्रथम भारतात आणि नंतर इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च केले जाईल.चला तर मग या नव्या कारबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. आज आपण होंडा elevate बद्दल महत्वाच्या अशा पाच गोष्टी जाणून घेऊयात.

Honda Elevate लॉन्च डेट

होंडा कंपनीने आधीच घोषणा केली आहे की, Elevate भारतात सप्टेंबरमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र लॉन्चिंगची तारीख कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
2024 Maruti Suzuki Dzire Launch Live Updates: Prices start at Rs 6.79 lakh, to rival Honda Amaze
५ स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन मारुती जनरेशन Dzire 2024 लाँच; पाहा किंमत
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

हेही वाचा : Honda Elevate SUV आज भारतात होणार लॉन्च; स्टायलिंग फिचर्सची माहिती आली समोर, किंमत मात्र गुलदस्त्यात..

Honda Elevate : बुकिंग्स

होंडा Elevate चे बुकिंग हे सुरू झाले आहे. तुम्ही २१,००० रुपयांच्या टोकन रकमेवर कंपनीच्या अधिकृत वेबसाईट (होंडा फ्रॉम होम ऑनलाईन प्लॅटफॉर्म) किंवा अधिकृत डिलर्सकडे जाऊन केले जाऊ शकते.

Honda Elevate : किंमत

होंडा कंपनी लवकरच आपली Elevate एसयूव्ही लॉन्च करणार आहे. कदाचित कंपनी या एसयूव्हीची किंमत १०. ५० लाख ते १८ लाख (एक्स-शोरूम) रुपये असण्याची शक्यता आहे.

Honda Elevate : मायलेज

होंडा एलिव्हेट एसयूव्ही ही कार सिटी मिड-साईज सेडानसह पॉवरट्रेन शेअर करते. यामध्ये 121 bhp 1.5 लीटर नॅचरली-अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असणार आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि CVT ला जोडलेले असेल. या कारमध्ये 1.5-लीटर अ‍ॅटकिन्सन सायकल पेट्रोल स्ट्राँग हायब्रीड युनिट दोन इलेक्ट्रिक मोटर्सला संलग्न असू शकते असे म्हटले जात आहे. हे यूनिट e-CVT शी जोडलेले असू शकते.

हेही वाचा : ADAS, अलॉय व्हील्ससह ‘या’ दमदार फीचरमुळे किआ सेलटॉस फेसलिफ्ट ठरते ह्युंदाई क्रेटापेक्षा अव्वल?

स्पर्धा आणि इंजिन

Honda Elevate एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा, २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्ट, मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा Urban Urban Cruiser आणि स्कोडा कुशाक या गाड्यांशी स्पर्धा करेल. Elevate SUV मध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन होंडा सिटीला देखील असलेला बघायला मिळते. हे इंजिन ११९ बीएचपी आणि १४५ एनएम टॉर्क जनरेट करते. यामध्ये ट्रान्स्मिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आले आहे. तसेच कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये या कारची इलेक्ट्रिक सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे.