New Honda Monkey 125cc Lightning Launch: होंडा टू-व्हीलर्स भारतासह जगभरात अनेक छोट्या बाइक्स आणि स्कूटर्सची विक्री करते. अशीच एक बाईक Honda Monkey 125 आहे. ही बाइक जपानमध्ये आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही लोकप्रिय आहे. कंपनीने अलीकडेच त्याची नवीन लाइटिंग एडिशन बाजारपेठेत लाँच केली आहे. बाईक पिवळ्या रंगात खूपच आकर्षक दिसते. मंकी लाइटनिंग एडिशनला USD फोर्क्स, फ्युएल टँक, साइड पॅनल्स, स्विंगआर्म आणि ट्विन रिअर शॉक अॅब्सॉर्बर्सवर पिवळ्या रंगाची छाया मिळते. क्रोमचा प्रचंड वापर बाइकला आणखी आकर्षक बनवतो. फ्रंट आणि रिअर फेंडर्स, हेडलॅम्प्स, इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्रेक आणि क्लच लीव्हर्स, टर्न इंडिकेटर आणि मागील टेल लॅम्प हे सर्व क्रोममध्ये पूर्ण झाले आहेत.

हे १२५cc इंजिनद्वारे समर्थित आहे जे जास्तीत जास्त ९.२ bhp पॉवर आणि ११ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. पूर्वीच्या मंकीला ४-स्पीड गिअरबॉक्स मिळाला होता, तर सध्याची आवृत्ती ५-स्पीड गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, त्याचे मायलेज ७०.५ किमी प्रति लिटर आहे. Honda Monkey च्या दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक आहेत, पुढच्या बाजूला ABS आहेत. शहरातील प्रवासासाठी, ५.६ लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. समोरील फेंडर आणि ब्लॉक पॅटर्न टायर्समुळे ऑफ-रोड ट्रॅकवर जाण्याची क्षमता देखील यात आहे.

Diwali Discount On Aprilia Bike
Diwali Discount On Aprilia Bike : झिरो डाउन पेमेंट, तीन वर्षांची वॉरंटी आणि बरंच काही… दिवाळीत ही खास बाईक खरेदी करण्याची तुमच्याकडे संधी
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Bike stunt Viral Video
‘जेव्हा लावलेला अंदाज चुकतो…’, बाईकवरून स्टंट करताना अचानक चाक निसटलं अन् पुढे जे घडलं…; VIDEO पाहून नेटकरी संतप्त
Hero bike offers diwali discount on bike and scooters of Hero MotoCorp
डिस्काउंटसाठी दिवाळीची वाट पाहताय? त्याआधीच घरी आणा ‘ही’ जबरदस्त बाईक, हिरो देतेय ‘या’ बाईक्स आणि स्कूटरवर भरघोस सूट
Diwali Sale Top Offers for Ola Electric S1 X
९०,००० रुपयांत खरेदी करा ओलाची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक स्कूटर! गूगलवरही होतेय सर्वाधिक ट्रेंड? जाणून घ्या फीचर्स अन् बरचं काही
Flipkart Big Billion Days Sale Chetak 3202 deals
Flipkart Big Billion Days Sale : चेतक ३२०२च्या खरेदीवर मिळवा १७,००० रुपयांपर्यंत सूट!
helmets Taloja, bike riders helmets Taloja,
पनवले : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून हेल्मेटचे वाटप
Flipkart Big Billion Days Sale Discover best deals on top 3 EV scooters
Flipkart Big Billion Days Sale: इलेक्ट्रिक बाइक खरेदी करण्याचा विचार करताय? या ३ EV स्कूटरवर मिळतेय भन्नाट ऑफर

(हे ही वाचा : मारुतीने सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये केला बदल, दिसणार नाहीत काही सेफ्टी फीचर्स? खरेदी करण्यापूर्वी तपासा )

कंपनीने ही बाईक थायलंडमध्ये लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत TBH १०८,९०० म्हणजेच सुमारे २.५९ लाख रुपये आहे. त्या तुलनेत, मानक मंकी व्हेरिएंटची किंमत ९९,७०० THB (अंदाजे रु. २.३८ लाख) आहे. Honda मंकी इस्टर एग एडिशन देखील ऑफर करते, ज्याची किंमत १०९,९०० THB (अंदाजे रु. २.६२ लाख) आहे.

भारतात कधी होणार लाँच

भारतात ही बाईक कधी लाँच होणार कंपनी भारतात Honda Navi नावाची मिनी बाईक विकते, ज्याला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.