Honda has launched the CB350 retro classic in India: होंडा भारतीय बाजारात अनेक दुचाकी सादर करत धुमाकूळ घालत असते. यातच आता होंडाने भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक सादर केली आहे. या बाईकचे नाव ‘Honda CB350 Retro Classic’ असून ही बाईक जबरदस्त फीचर्स अन् डिझाईनसह लाँच करण्यात आली आहे.
नवीन बाईकमध्ये काय आहे खास?
नवीन बाईकमध्ये पुन्हा डिझाइन केलेली टाकी आहे. बाईकला रेट्रो क्लासिक लूक देण्यात आला आहे, दोन्ही टोकांना असलेले अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेक बाईकच्या आधुनिक टाइमलाइनला हायलाइट करतात. यामध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स, ड्युअल रीअर शॉक, ड्युअल-चॅनल एबीएस, होंडा स्मार्टफोन व्हॉईस कंट्रोल सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी लाइटिंग यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
(हे ही वाचा : टेस्लाचे धाबे दणाणले! स्मार्टफोन, टीव्ही, घड्याळे बनविल्यानंतर आता ‘ही’ प्रसिध्द कंपनी आणतेय स्वस्त नवी सेडान कार )
इंजिन
उर्जा निर्मितीसाठी, नवीन Honda CB350 बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित ३४६cc इंजिन आहे जे ५-स्पीड गिअरबॉक्ससह २१bhp पॉवर आणि २९Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन नवीन उत्सर्जन मानक BSVI OBD2-B शी सुसंगत आहे. यात स्लिप, असिस्ट क्लच आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल देखील आहे.
किंमत
नवीन Honda CB350 पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून भारतीय बाजारपेठेत, Honda ची नवीन बाईक DLX आणि DLX Pro या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची किंमत १.९३ लाख रुपये आहे. ही बाईक बाजारपेठेत Royal Enfield Classic 350 बाईकला टक्कर देईल, असे सांगण्यात येत आहे. नवीन Honda CB350 देशभरातील कोणत्याही BigWing शोरूममधून बुक केले जाऊ शकते.