Honda SP125 Sports Edition launched: भारतीय बाजारपेठेमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक बाईक अगदी कमी किमतीमध्ये लाँच होताना दिसत आहे. तुम्ही सुध्दा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आपल्या SP125 बाईकचे स्पोर्ट्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे. चला तर मग या बाईकमध्ये तुमच्यासाठी काय खास आहे आणि ही बाईक घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील? याबद्दल जाणून घेऊया…
Honda SP125 Sports Edition इंजिन स्पेसिफिकेशन्स
Honda SP125 Sports Edition बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४cc इंजिन आहे. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह १०.७bhp पॉवर आणि १०.९Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. होंडाच्या SP125 स्पोर्ट्स एडिशनमध्ये नवीनतम उत्सर्जन मानक BS6, OBD2 आधारित PGM-FI इंजिन आहे. Honda Motorcycle & Scooter India या बाईकवर १० वर्षांची वॉरंटी पॅकेज देत आहे. विशेष वॉरंटी पॅकेजमध्ये ३ वर्षांची मानक वॉरंटी आणि ७ वर्षांची पर्यायी हमी समाविष्ट आहे. नवीन Honda बाईक भारतीय बाजारात उपलब्ध TVS Raider 125 आणि Bajaj Pulsar 125 यांना टक्कर देईल.
Honda SP125 Sports Edition वैशिष्ट्ये
Honda SP125 स्पोर्ट्स एडिशन बाजारात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि हेवी ग्रे मेटॅलिक. बोल्ड टँक डिझाइन, मॅट मफलर कव्हर आणि अॅडव्हान्स ग्राफिक्सच्या माध्यमातून याला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. बाईकच्या बॉडी पॅनेल्स आणि अलॉय व्हीलवर ताजे व्हायब्रंट पट्टे दिसतात. नवीन स्पोर्ट्स एडिशन बाईकमध्ये चमकदार एलईडी हेडलॅम्प आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. गियर स्टेटस इंडिकेटर तसेच मायलेजशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती पूर्णपणे डिजिटल कन्सोलमध्ये दृश्यमान आहे.
Honda SP125 Sports Edition किंमत
कंपनीच्या नवीन बाईकची किंमत ९०,५६७ रुपये (एक्स-शोरूम) आहे. Honda SP125 स्पोर्ट्स एडिशनचे बुकिंगही सुरू झाले आहे. स्पोर्ट्स एडिशनचे बुकिंग देशभरातील सर्व Honda Red Wing शोरूममधून केले जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे Honda SP125 Sports Edition मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.