जपानी टू-व्हीलर कंपनी Honda बाईकचा भारतीय बाजारपेठेत दबदबा कायम आहे. या बाईक्सना बाजारपेठे मोठी मागणी आहे. आता होंडाने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. होंडाने बाजारपेठेत आपली सर्वात महागडी बाईक सादर करुन सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
Honda ने आता XL750 Transalp ही साहसी बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कमी वजनाची ही लेटेस्ट बाईक मोठ्या किमतीत सादर करण्यात आली आहे. ही बाईक भारतीय बाजारपेठेत मर्यादित संख्येत सादर करण्यात आली आहे. Honda XL750 Transalp भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी १०० क्रमांकांमध्ये उपलब्ध आहे. होंडाने या हलक्या वजनाच्या बाईकची पहिली झलकही याआधी इटली येथील एका शोदरम्यान दाखविली होती.
Honda XL750 Transalp वैशिष्ट्ये
Honda XL750 Transalp साहसी बाईक १९८० च्या दशकातील मूळ ट्रान्सल्पचा नवीनतम अवतार आहे. नवीनतम बाइक होंडाच्या आफ्रिका ट्विन सारखीच आहे. स्टाइलिंगच्या बाबतीतही, Honda XL750 Transalp बाईक Honda Africa Twin Adventure मॉडेलसारखीच आहे. यात साइड-स्लंग एक्झॉस्ट आणि उंच फेअरिंग आहे. Honda XL750 Transalp मध्ये २१ इंच फ्रंट व्हील आणि १८ इंच मागील चाक आहे.
(हे ही वाचा : ग्राहकांना धक्का! ‘या’ प्रसिध्द कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कारची विक्री बंद, फक्त इलेक्ट्रिक गाड्या धावणार रस्त्यावर )
नवीन साहसी बाईकच्या पुढील बाजूस ४३ mm Showa USD सस्पेंशन सेटअप उपलब्ध आहे. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, याला दोन्ही टोकांना ड्युअल-चॅनल ABS सह दोन्ही डिस्क ब्रेक मिळतात. याशिवाय, यात ५-इंचाचा TFT डॅश समाविष्ट आहे ज्यामध्ये स्पीडोमीटर, टॅकोमीटर, गियर-पोझिशन इंडिकेटर, इंधन गेज आणि वापर, राइडिंग मोड, इंजिन पॅरामीटर्स यांसारख्या अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. नवीनतम बाइकमध्ये रायडरच्या पसंतीनुसार कस्टमाइझ करण्यायोग्य डिस्प्ले आहे. आणि बाईक स्क्रीनवर किंवा डाव्या हँडलबारवर प्रदान केलेल्या स्विचगियरद्वारे सहजपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते. यामध्ये अनेक रायडिंग मोड देण्यात आले आहेत. ज्यामध्ये स्पोर्ट, स्टँडर्ड, रेन, ग्रेव्हल मोड समाविष्ट आहे.
Honda XL750 Transalp इंजिन
नवीन Honda XL750 Transalp मध्ये लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित ७५५cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे. हे इंजिन २७० डिग्री क्रँकशाफ्टसह येते. हे इंजिन ६ स्पीड गिअरबॉक्ससह ९०bhp पॉवर आणि ७५Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
पहिल्या १०० ग्राहकांसाठी बुकिंग सुरू
Honda XL750 Transalp भारतीय बाजारपेठेत रॉस व्हाईट आणि मॅट बॅलिस्टिक ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन XL750 Transalp च्या पहिल्या १०० ग्राहकांसाठी आता Honda च्या Bigwing शोरूममध्ये बुकिंग सुरू आहे. या बाईकला १०.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत सादर करण्यात आलं आहे.