१५० सीसी सेगमेंटमध्ये बजाज पल्सरची कामगिरी जबरदस्त होती आणि पुन्हा एकदा या बाईकने अपाचे आणि युनिकॉर्नला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. परंतु या विभागात, एक बाईक अशीही आहे, ज्या बाईकने वार्षिक आधारावर सर्वाधिक वाढ केली आहे. ती बाईक Honda Hornet 2.0 आहे. या बाईकला सप्टेंबर २०२३ मध्ये वार्षिक आधारावर ४५८.२६ टक्क्यांनी वाढ मिळाली आहे.
किती झाली विक्री
गेल्या महिन्यातील विक्री पाहिल्यास, Honda Hornet 2.0 ने सप्टेंबर २०२३ मध्ये खूप चांगली विक्री केली आहे. गेल्या महिन्यात या बाईकची ३ हजार ८५२ युनिट्स विकली गेली. यासह, या बाईकने वार्षिक आधारावर ४५८.२६ टक्क्यांची जबरदस्त वाढ केली आहे. या बाईकच्या चांगल्या विक्रीचे श्रेय तिची उत्तम रचना आणि कमी किमतीला दिले जात आहे. यावरून असे दिसून येते की, २०० सीसी सेगमेंटमध्ये लोकांना ही बाईक खूप आवडते.
(हे ही वाचा : यंदाच्या दसऱ्याला अवघ्या १ लाखात घरी आणा ३४ किमी मायलेज देणारी मारुतीची फॅमिली कार, किती असेल EMI? )
Honda Hornet 2.0 ही फिचर्सच्या बाबतीत एकदम अपडेटेड बाईक आहे. यात पुढील बाजूस अपसाइड डाउन टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे. बाईकमध्ये एलईडीमध्ये फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लाईट आणि टर्न इंडिकेटरही देण्यात आले आहेत. बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस, इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच आणि ड्युअल डिस्क ब्रेक्स सारखे फीचर्स आहेत. कंपनी या बाईकला चार कलर स्कीममध्ये ऑफर करत आहे.