Bharat Mobility Global Auto Expo 2024: होंडा मोटारसायकल इंडिया लवकरच देशात फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेली नवीन बाईक लाँच करण्याच्या तयारित आहे. होंडा इंडिया ग्रुपने प्रगती मैदान, दिल्ली येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्सपो २०२४ मध्ये त्यांची अनेक उत्पादने सादर केली. या शोमध्ये कंपनीने त्यांच्या पहिल्या फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेल्या नवीन बाईकची झलक दाखविली आहे.
Honda समूह ज्यामध्ये Honda Motorcycle & Scooter India (HMSI), Honda Power Pack Energy India (HEID), Honda Cars India Limited (HCIL) आणि HIPP (Honda India Power Products) यांचा समावेश आहे, त्यांची अनेक उत्पादने प्रदर्शित केली. या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने शाश्वतता आणि रस्ता सुरक्षा लक्षात घेऊन काही नवीन उत्पादने प्रदर्शित केली आहेत. २०५० पर्यंत सर्व उत्पादनांसाठी कार्बन न्यूट्रॅलिटी आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
पहिली फ्लेक्स फ्युएल बाईक सादर
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने भारत मोबिलिटी ऑटो एक्सपोमध्ये प्रथमच फ्लेक्स इंधन बाईक सादर केली. मात्र, ही बाईक इतर देशांमध्ये आधीच उपलब्ध आहे आणि ब्राझीलमध्ये ७० लाख लोकांकडे ती आहे. भारत सरकारच्या फ्लेक्स फ्युएल इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी ही बाईक येथे सादर करण्यात आली आहे. फ्लेक्स इंधन इथेनॉल आणि गॅसपासून बनलेले आहे. होंडाच्या या पहिल्या बाईकला सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड २९३.५२cc इंजिन देण्यात आले आहे.
(हे ही वाचा :भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोला आजपासून सुरुवात; तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार कार लाँच? जाणून घ्या…)
बॅटरी शेअरिंग तंत्रज्ञान दाखवले
याशिवाय होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडियाने नवीन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले. कंपनीने Honda Power Pack Exchanger E आणि Honda Mobile Power Pack E सादर केले. स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन्सद्वारे ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन दिले जाईल. कंपनीने इलेक्ट्रिक दोन आणि तीन चाकांसाठी बॅटरी शेअरिंग तंत्रज्ञान प्रदर्शित केले.
होंडा कार्सने ‘ही’ उत्पादने दाखवली
Honda Car India ने नुकत्याच लाँच झालेल्या SUVs Honda The City: e-HEV आणि Honda Elevate सादर केल्या. The city: e-HEV स्वयं-चार्जिंगला समर्थन देते. याशिवाय, कंपनीने नुकतीच आपली शक्तिशाली SUV Elevate लाँच केली होती आणि कंपनीने ती एक्सपोमध्ये देखील सादर केली होती.