Honda Shine 100 with OBD2B launched in India: होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडिया (HMSI)ने आज सुधारित स्‍टाइलिंगसह अपडेटेड OBD2B कंप्लायंट शाइन १०० लाँच केली. नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रुपये (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) आहे. ही मोटरसायकल आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

नवीन शाइन १००: अपडेटेड डिझाइन आणि इंजिन

नवीन शाइन १०० मध्‍ये भारतातील लोकप्रिय शाइन १२५ मधून प्रेरित असलेली आकर्षक डिझाइन शैली आहे. या मोटरसायकलच्‍या बॉडी पॅनेल्‍सवर नवीन ग्राफिक्‍स व होंडा लोगो आहे. या मोटरसायकलमधील लक्षवेधक फ्रण्‍ट काऊल, ब्‍लॅक-आऊट अलॉई व्‍हील्‍स, प्रॅक्टिकल अॅल्‍युमिनिअम ग्रॅबरेल, लांब व आरामदायी सिंगल-पीस सीट आणि स्‍लीक मफलर मोटरसायकलच्‍या स्‍मूद स्‍टाइलला अनुसरून आहेत, तसेच या सीट दैनंदिन प्रवासासाठी सोयीसुविधेमध्‍ये वाढ करतात.

शाइन १०० पाच डायनॅमिक रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे राइडरच्‍या विविध पसंतींची पूर्तता होते. ब्‍लॅक विथ रेड, ब्‍लॅक विथ ब्‍ल्‍यू, ब्‍लॅक विथ ऑरेंज, ब्‍लॅक विथ ग्रे आणि ब्‍लॅक विथ ग्रीन असे हे रंग आहेत. वजनाने हलकी, पण टिकाऊ डायमंड-टाइप फ्रेमवर निर्माण करण्‍यात आलेली शाइन १०० उच्‍च दर्जाच्‍या राइड आरामदायीपणासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या मोटरसायकलमध्‍ये टेलिस्‍कोपिक फ्रण्‍ट फोक्‍स आणि ट्विन रिअर शॉक अॅब्‍जॉबर्स आहेत, ज्‍यामधून विविध रस्‍त्‍यांवर स्थिरतेची खात्री मिळते.

अधिक सुरक्षिततेसाठी शाइन १०० मध्‍ये दोन्‍ही बाजूस ड्रम ब्रेक्‍ससोबत सीबीएस (कम्‍बाइन्‍ड ब्रेकिंग सिस्‍टम) आहे. या मोटरसायकलमध्‍ये ९८.९८ सीसी, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्‍ड, फ्यूएल-इंजेक्‍टेड इंजिनची शक्ती आहे, जे आता आधुनिक उत्‍सर्जन नियमांची पूर्तता करण्‍यासाठी OBD2B कंप्लायंट आहे. हे इंजिन ७५०० आरपीएममध्‍ये ५.४३ केडब्‍ल्‍यू पॉवर आणि ५००० आरपीएममध्‍ये ८.०४ एनएम टॉर्क देते, ज्‍यामधून स्मूद व कार्यक्षम राइडची खात्री मिळते. इंजिनसोबत ४-स्‍पीड गिअरबॉक्‍स आहे.

नवीन शाइन १०० : किंमत आणि उपलब्‍धता (Honda Shine 100 Price and Availibility )

नवीन २०२५ होंडा शाइन १०० ची किंमत ६८,७६७ रुपये (एक्‍स-शोरूम दिल्‍ली) आहे. ही मोटरसायकल सिंगल व्‍हेरिएंटसह पाच रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे. शाइन १०० आता भारतभरातील सर्व एचएमएसआय डिलरशिप्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे.

Story img Loader