होंडा कार्स ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि अपडेट्स असलेले मॉडेल कंपनी लॉन्च करत असते. चालू असलेल्या महिना आणि पुढील महिना हा सणासुदीचा महिना आहे. अनेक सण या महिन्यांमध्ये साजरे केले जाणार आहेत. याच दरम्यान कंपनीने बाजारात दोन फेस्टिव्ह मॉडेल्स लॉन्च केले आहेत. कंपनीनं होंडा सिटीची ‘एलिगंट’ आणि लोकप्रिय असणाऱ्या होंडा अमेझची एलाइट एडिशन लॉन्च केली आहे. मर्यादित संख्येमध्ये वैशिष्‍ट्यपूर्ण एडिशन्‍स मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन (एमटी) व कन्टिन्‍युअस्‍ली व्‍हेरिएबल ट्रान्‍समिशन (सीव्‍हीटी) या दोन्‍ही व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहेत. होंडा सिटी ‘व्‍ही ग्रेड’वर व होंडा अमेझ व्‍’हीएक्‍स ग्रेड’ वर आधारित आहेत. या एडिशन्‍स सुधारित प्रिमियम पॅकेज आणि सर्व रंगांच्‍या पर्यायांसह येतात.

आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने ‘द ग्रेट होंडा फेस्ट’ च्या अंतर्गत होंडा सिटी (सेडान) आणि अमेझच्या अन्य व्हेरिएंटवर स्पेशल फेस्टिव्ह ऑफर लॉन्च केली आहे. या दरम्यान ग्राहक ३१ ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत सर्व अधिकृत होंडा डिलरशिप्‍समधून त्‍यांची आवडती होंडा कार खरेदी करताना अनेक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Seven stalled projects on track soon speed up land acquisition process in five projects
रखडलेले सात प्रकल्प लवकरच मार्गी, पाच प्रकल्पांतील भूसंपादन प्रक्रियेला वेग
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी

हेही वाचा : मेड-इन-इंडिया Harley च्या सर्वात स्वस्त बाईकची डिलिव्हरी ‘या’ तारखेपासून होणार सुरू, पाहा किती पैसे मोजावे लागणारे

फेस्टिव्‍ह एडिशन्‍सच्‍या लॉन्चिंगवेळी मत व्‍यक्‍त करत होंडा कार्स इंडिया लि.च्‍या विपणन व विक्रीचे संचालक श्री. युईची मुराता म्‍हणाले, ”आम्‍ही सणासुदीच्‍या काळासाठी सज्‍ज असण्‍यासह आमच्या स्पेशल प्रिमियम पॅकेजसह आमच्‍या मॉडेल्‍सना अधिक संपन्‍न करण्‍यावर भर दिला आहे. जे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील. सिटी व अमेझच्‍या नवीन एडिशन्‍स आकर्षक दरांमध्‍ये अतिरिक्‍त फीचर्ससह सुधारित स्टाइल व सोयीसुविधांसह प्रदान करण्‍याचा आमचा प्रयत्न आहे.” ते पुढे म्‍हणाले, ”सण आपल्‍याला आनंद देतात आणि आमच्‍या जीवनात सणांचे विशेष महत्त्व आहे. या नवीन लिमिटेड एडिशन्‍सच्‍या लॉन्चव्‍यतिरिक्‍त आम्‍ही सर्व ग्राहकांसाठी नवीन कार खरेदी अधिक लाभदायी करण्‍यासाठी सिटी व अमेझच्‍या इतर व्हेरिएंट्सवर देखील आकर्षक ऑफर्स व प्रमोशन्‍स सादर केले आहेत.”

होंडा सिटी आणि होंडा अमेझ: फीचर्स

होंडा सिटी एलिगंट व्हेरिएंटमध्ये एलईडी लाइट्स. ट्रंक स्पॉयलर, वायरलेस चार्जिंग, फ्रंट फेंडर ग्रॅनीश आणि फूटवेल लॅम्प असे फिचर मिळतात. तर होंडा अमेझ एलाइट एडिशनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये तयार प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, फ्रंट फेंडर गार्निश, अँटी फॉग लेयर आणि तयार इन्फ्लेक्टरसारखे फीचर्स देण्यात आले आहे. होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या फेस्टिव्ह एडिशनमध्ये एकसारखेच इंजिन स्पेसिफिकेशन येतात. एलिगंट एडिशन असणारी होंडा सिटी आणि एलाइट एडिशन असणारी होंडा अमेझ भारतीय बाजारात ह्युंदाई वेरना, मारुती सुझुकी सियाझ सारख्या मिड साइझ आणि कॉम्पॅक्ट सेडानला टक्कर देणार आहे.

होंडा सिटी आणि होंडा अमेझ: किंमत

होंडा सिटी एलिगंट एडिसशनची किंमत १२.५७ (दिल्ली, एक्सशोरूम ) लाख रुपये आहे. ही कार दोन गिअरबॉक्स पर्यायांमध्ये लॉन्च झाली आहे. यामधील CVT व्हेरिएंटची किंमत १३, ८२ (एक्सशोरूम) लाख रुपये आहे. तर होंडा अमेझ एलाइट एडिशनच्या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत ९.०४ लक्ष रुपये तर CVT व्हेरिएंटची किंमत ९.८६ लाख (एक्सशोरूम) रुपये आहे.