होंडाने आपली २०२२ अफ्रिका ट्विन अ‍ॅडवेंचर्स स्पोर्ट्स बाइक भारतात लाँच केली आहे. ही बाइक नवीन पेंट थीममध्ये सादर करण्यात आली आहे. होंडाने या बाइकचे मॅन्युअल आणि डीसीटी असे दोन प्रकार लाँच केले आहेत. ज्यामध्ये मॅन्युअल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १६.०१ लाख रुपये आहे आणि डीटीसी व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत १७.५५ लाख रुपये आहे. नवीन होंडा अफ्रिका ट्विनचे बुकिंग होंडाच्या Big Wing आउटलेट्स मधून सुरु झाले आहे. एचएमएसआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीअत्सुशी ओगाटा यांनी सांगितलं की, “२०१७ मध्ये अफ्रिका ट्विनचा परिचय झाल्यापासून या मोटरसायकलने भारतात अ‍ॅडवेंचर्स रायडिंगमध्ये एक नवा टप्पा गाठला आहे. या बाइकचे मजबूत इंजिन आणि कुठेही जाण्याची क्षमता आहे. आफ्रिका ट्विन अ‍ॅडव्हेंचर मोटरसायकल रायडरच्या पायांमधील अरुंद प्रोफाइल आणि वापरण्यायोग्य सामर्थ्यामुळे रायडर्सच्या पसंतीस उतरली आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२२ अफ्रिका ट्विन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइकच्या अद्ययावत मॉडेलला अ‍ॅडजस्टेबल सीट्स, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीसह रॅली-स्टाईल पॉझिटिव्ह एलसीडी कलर डिस्प्ले, डेटाइम रनिंग लाइट्स आणि कॉर्नरिंग लाइट्ससह ड्युअल एलईडी हेडलाइट्स दिले आहेत. त्याचबरोबर बाइकमध्ये २४.५ लीटरची इंधन टाकी आहे.

भारतीय मोटरसायकलींची लॅटिन अमेरिकेत मुसंडी

होंडा अफ्रिका ट्विन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात १०८२.९६ सीसी लिक्विड-कूल्ड ४-स्ट्रोक ८-व्हॉल्व्ह पॅरलल-ट्विन इंजिन आहे. जे ९८ बीएचपी पॉवर आणि १०३ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीने या बाइकमध्ये मॅन्युअल आणि डीसीटी गिअरबॉक्स दिले आहेत. यासोबतच कंपनीने २ चॅनल एबीएसही दिले आहेत

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda launched 2022 africa twin adventure sports bike in india rmt
Show comments