Honda Elevate Black Edition Launched Today : होंडा या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम कार उत्‍पादक कंपनीने त्यांची लोकप्रिय प्रीमियम ‘एलिव्हेट’ (Honda Elevate) एसयूव्‍हीचे दोन एडिशन्‍स लाँच केले आहेत. या एसयूव्हीच्या एक्‍सक्‍लुझिव्‍ह एडिशन्‍सचे नाव होंडा एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ आणि होंडा एलिव्‍हेट ‘सिग्‍नेचर ब्‍लॅक’ असे आहे. हे एक्‍सक्‍लुझिव्‍ह एडिशन्‍स नवीन क्रिस्टल ब्‍लॅक पर्ल रंगामध्‍ये सादर करण्‍यात आले आहेत. मार्केटमध्ये ग्राहकांकडून मिळालेल्‍या मागणीला प्रतिसाद देत या गाड्या लाँच करण्‍यात आल्या आहेत. तर या एसयूव्हीचे फीचर्स कसे असणार आणि याची किंमत काय असणार हे जाणून घेऊया…

बोल्ड आणि स्ट्रायकिंग एक्सटेरिअर (Bold And Striking Exterior)

नवीन एलिव्‍हेट (Honda Elevate) ब्‍लॅक एडिशन तिच्‍या स्‍लीक ब्‍लॅक एक्‍स्‍टीरिअरसह लाँच करण्यात आली आहे, ज्‍यामध्‍ये ब्‍लॅक अलॉई व्‍हील्‍स आणि नट्स आहेत. आकर्षक लूक देण्‍यासह या कारमध्‍ये अपर ग्रिलवर क्रोम ॲसेंट्स आणि सिल्‍व्‍हर फिनिश फ्रण्‍ट व रिअर स्किड गार्निशेस्, लोअर डोअर गार्निश व रूफ रेल्‍स आहेत. तसेच रिअरमध्‍ये स्‍पेशल ‘ब्‍लॅक एडिशन’ एम्‍ब्‍लेम (emblem)सुद्धा असणार आहे. यामुळे एकूणच एलिव्‍हेटला एक प्रीमियम लूक मिळतो, जी त्याला इतर गाड्यांपेक्षा वेगळे बनवते. नवीन एलिव्‍हेट सिग्‍नचेर ब्‍लॅक एडिशन लक्‍झरी व डिस्टिंक्शनमध्ये आणखीन भर घालते आहे.

zara dar pornhub video income
Zara Dar: PhD सोडून पॉर्नहब निवडलं; आता अभ्यासाचे व्हिडीओ टाकून कमावते अधिक पैसे; कोण आहे जारा डार?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
Vinfast introduced Two SUV in Bharat Mobility Global Expo 2025
Vinfast Coming To India: ‘विनफास्ट’ची भारतात होणार धमाकेदार एंट्री! भारत मोबिलिटीमध्ये ‘या’ दोन एसयूव्ही करणार सादर
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

हेही वाचा…Vinfast Coming To India: ‘विनफास्ट’ची भारतात होणार धमाकेदार एंट्री! भारत मोबिलिटीमध्ये ‘या’ दोन एसयूव्ही करणार सादर

स्पोर्टी आणि सॉफिस्टेकॅटेड इंटेरिअर (Sporty And Sophistocated Interior)

दोन्‍ही एडिशन्‍सच्‍या आतील बाजूस अपस्‍केल ऑल-ब्‍लॅक इंटीरिअर थीम आहे, जी वेईकलच्‍या प्रीमियम अपील (premium appeal) मध्ये अधिक आकर्षकतेची भर घालतात. ब्‍लॅक एडिशन तसेच सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनमध्‍ये ब्‍लॅक लेदरेट सीट्ससह ब्‍लॅक स्टिचिंग, ब्‍लॅक डोअर पॅड्स व पीव्‍हीसीमध्‍ये रॅप केलेले आर्मरेस्‍ट्स, ऑल-ब्‍लॅक डॅशबोर्ड आहे, जे आरामदायीपणा व स्‍टाइलच्‍या सिमलेस फ्यूजनसह उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.

सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशनमधील केबिन सात कलर ॲम्बियण्‍ट लायटिंगसह डिझाईन करण्यात आली आहे. जी आधुनिक, लक्‍झरी फीलचा आनंद देते. दोन्‍ही एलिव्‍हेट ब्‍लॅक एडिशन आणि सिग्‍नेचर ब्‍लॅक एडिशन टॉप झेडएक्‍स ग्रेडवर आधारित आहेत, ज्‍या ग्राहकांना आकर्षक, स्‍लीक ऑल-ब्‍लॅक स्‍टायलिंगसह हायएन्ड (उच्च-स्तरीय) फीचर्समधून निवड करण्‍याची सुविधा देतात. दोन्‍ही एडिशन्‍समध्‍ये होंडाच्‍या प्रतिष्ठित १.५ लीटर आय-व्‍हीटेक पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्‍युअल व सीव्‍हीटी ट्रान्‍समिशन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

व्हेरिएंट, किंमत आणि बुकिंग तारीख (Honda Elevate)

होंडा एलिव्हेटब्लॅक एडिशनसिग्नेचर ब्लॅक एडिशन
झेडएक्स एमटी (ZX MT)१५.५१ लाख रुपये१५.७१ लाख रुपये
झेडएक्स सीव्हीटी (ZX CVT)१६.७३ लाख रुपये१६.९३ लाख रुपये

ग्राहक होंडा डीलरशिपवरून ही ब्लॅक एडिशन्स बुक करू शकतात. ब्‍लॅक एडिशन्‍सच्‍या सीव्‍हीटी व्हेरिएंटची डिलिव्‍हरी २५ जानेवारी २०२५ तर मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन व्‍हेरिएण्‍ट्सच्‍या डिलिव्‍हरीज २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

Story img Loader