होंडा मोटारसायक अँड स्कूटर इंडिया कंपनीने भारतात आपली अपडेटेड CB300R बाइक लॉन्च केली आहे. होंडा एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स आणि काही अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्स किंवा अपडेट्स देते. ज्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळू शकेल. या बाइकमध्ये OBD2 नुसार इंजिन देण्यात आले आहे. या बाइकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिन आणि गिअरबॉक्स

कंपनीने लॉन्च केलेल्या अपडेटेड होंडा CB300R मध्ये पॉवर जनरेशनसाठी स्ट्रोक, सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीवर आधारित २८ सीसीचे इंजिन मिळते. आधीच्या तुलनेत यामध्ये OBD2 चे इंजिन मिळते. यामधील इंजिन ३०.७ बीएचपी ताकद आणि २७.५ एनएम टॉर्क जनरेट करते. बाइकचे वजन हे १४६ किलोग्रॅम इतके आहे. अपडेटड मॉडेल हे या सेगमेंटमधील सर्वात हलके मॉडेल आहे.

हेही वाचा : रॉयल एन्फिल्डने लॉन्च केले Meteor 350 चे ‘हे’ व्हेरिएंट, फीचर्स एकदा बघाच

फीचर्स

अपडेटेड होंडा CB300R रोडस्टरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याच्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास गोलाकार एलईडी हेडलाइट, ताकदवान पेट्रोलची टाकी, स्प्लिट सीट्स देण्यात आले आहे. तसेच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लायटिंग आणि अन्य फीचर्स या अपडेटेड बाइकमध्ये देण्यात आले आहेत. तसेच नवीन बाइकमध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि लाइट स्विचसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. होंडा CB300R हे अपडेटेड मॉडेल तुम्हाला दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ब्रेकिंगसाठी समोरील बाजूस २९६ मिमीचे डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २२० मिमीचे डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच यात ड्युअल चॅनेल ABS फिचर देखील देण्यात आले आहे.

किंमत

होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने आपली अपडेटेड होंडा CB300R लॉन्च केली आहे. नवीन होंडा CB300R स्पोर्ट्स रोडस्टरच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.या बाइकची किंमत २.४० लाख (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरु होते.