2023 Honda CB300R Launched: देशात दुचाकीची वाढती मागणी पाहता होंडाने मोठा धमाका केलाय. Honda मोटरसायकल्स अँड स्कूटर्स इंडियाने भारतीय बाजारात आपली अपडेटेड ‘2023 Honda CB300R’ बाईक लाँच केली. ही बाईक नवीन उत्सर्जन मानक OBD2 शी सुसंगत इंजिनसह सुसज्ज आहे. चला तर पाहूया या बाईकमध्ये काय असेल खास..
2023 Honda CB300R इंजिन आणि गिअरबॉक्स
अपडेटेड Honda CB300R ला उर्जा निर्मितीसाठी ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित २८६cc इंजिन मिळते. पूर्वीच्या तुलनेत, हे इंजिन आता अद्ययावत उत्सर्जन मानक (OBD2) ने सुसज्ज आहे, ज्यामुळे Honda चे नवीन स्पोर्ट्स रोडस्टर अधिक पर्यावरणपूरक आहे. त्याचे इंजिन ३०.७ bhp पॉवर आणि २७.५ Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे जे स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे समर्थित ६-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकचे वजन १४६ किलो आहे. नवीन Honda CB300R ही त्याच्या विभागातील सर्वात हलकी बाईक आहे.
2023 Honda CB300R वैशिष्ट्ये
अपडेटेड Honda CB300R रोडस्टरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन बाईक प्रीमियम Honda CB1000R सारखीच आहे. लुकबद्दल बोलायचे झाल्यास, यात गोल एलईडी हेडलाइट, मजबूत इंधन टाकी देण्यात आली आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, होंडाच्या या स्पोर्ट्स रोडस्टरला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी लाइटिंग प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय नवीन बाईकमध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि हॅझर्ड लाइट स्विच सारखी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत.
(हे ही वाचा : Mahindra XUV700 चा गेम होणार? देशात दाखल होताहेत नव्या अवतारात ३ सुरक्षित SUV कार, मारुतीचाही समावेश )
कंपनी Honda CB300R ही बाईक पर्ल स्पार्टन रेड आणि मॅट मॅसिव्ह ग्रे मेटॅलिक या दोन रंग पर्यायांमध्ये ऑफर करत आहे. नवीन बाईकच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या सस्पेंशन सेटअपमध्ये ४१ मिमी USD फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस अॅडजस्टेबल मोनो-शॉक समाविष्ट आहे. ब्रेकिंगसाठी, नवीन Honda CB300R मध्ये समोर २९६ mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस २२० mm डिस्क ब्रेक आहे आणि ड्युअल चॅनल ABS सारखी मानक वैशिष्ट्ये मदत करण्यासाठी जोडण्यात आली आहेत.
2023 Honda CB300R किंमत
2023 Honda CB300R’ या नवीन बाईकची किंमत २.४० लाख रुपये एक्स-शोरूम आहे. या बाईकसाठी देशभरातील सर्व होंडा बिगविंग (Honda BigWing) शोरूममध्ये बुकिंग सुरू झाले आहे.