Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बाईक लॉन्च केली आहे. होंडा मोटारसायकल स्कूटर इंडियाने आपली होंडा Shine १२५ लॉन्च केली आहे. यामध्ये OBD2 हे इंजिन देण्यात आले आहे. या नवीन लॉन्च झालेल्या होंडा शाईन १२५ ची किंमत, फीचर्स आणि इंजिनविषयी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंजिन आणि गिअरबॉक्स

Honda Shine 125 मध्ये कंपनीने सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलचेच इंजिन दिले आहे. हे इंजिन सिंगल सिलेंडर इंजिन असून १२३.९४ सीसीचे आहे. फ्युएल इंजेक्टेड टेक्नॉलॉजीवर आधारित या इंजिनला होंडाने अपडेट केले आहे जे आता OBD2 उत्सर्जन नियमांचे पालन करते. होंडा शाईन १२५ मध्ये देण्यात आलेले इंजिन १०.७ बीएचपी पॉवर आणि ११ एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी किरकोळ अपडेट सोडता होंडा शाईन १२५ मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.

हेही वाचा : ह्युंदाई Creta ला टक्कर देण्यासाठी ४ जुलै रोजी लॉन्च होणार Kia ची ‘ही’ एसयूव्ही, जाणून घ्या

होंडा शाईन १२५ च्या लॉन्चिंगवेळी होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक त्सुत्सुमु ओटानी म्हणाले, ” १२५ सीसी मोटारसायकलच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या शाईनचे यश म्हणजे ग्राहकांचा आमच्यावर असलेले प्रेम आणि विश्वास याचे प्रमाण आहे. जसे की, २०२३ शाईन १२५ लॉन्च करताना मला विश्वास आहे की, ही आपल्या सेगमेंटमध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करेल आणि आमची स्थिती आणखी मजबूतकरेल. ”

Honda Shine १२५ ची किंमत

कंपनीने होंडा शाईन १२५ बाईक ७९,८०० (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांमध्ये लॉन्च केली आहे.

Image Credit- Financial Express

नवीन २०२३ होंडा शाईन १२५ बाईक फ्रंट ड्रम आणि डिस्क ब्रेक या दोन पर्यायांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. ज्याची किंमत ७९,८०० आणि ८३, ८०० ( एक्स-शोरूम दिल्ली) रूपये इतकी आहे. ही १२५ सीसी प्रीमियम कॉम्पुटर मोटारसायकल हिरो ग्लॅमर 125, हिरो सुपर स्प्लेंडर, बजाज पल्सर 125 इत्यादींना टक्कर देते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda motorcycle and scooter india launch honda shaine 125 2023 with obd2 engine check price tmb 01
Show comments