होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाने भारतात आपली नवीन बाइक लॉन्च केली आहे. या बाइकचे नाव २०२३ CD110 Dream Deluxe असे आहे. ज्याची सुरुवातीची किंमत ७३,४०० (एक्स-शोरूम ,नवी दिल्ली) इतकी आहे. आऊटगोइंग मॉडेलची किंमत ७१,१३३ (एक्सशोरूम, नवी दिल्ली ) होती. २०२३ होंडा सीडी 110 Dream Deluxe ही नवीन बाइक हिरो पॅशन, टीव्हीएस स्पोर्ट आणि बजाज प्लॅटिनाला टक्कर देईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

होंडाच्या नवीन 2023 CD110 Dream Deluxe मधेय १०९. ५१ सीसीचे OBD2-अनुरूप, PGM-Fi इंजिन देण्यात आले आहे. जे इंजिन ८.६ बीएचपी पॉवर आणि ९.३० एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. या नवीन बाइकच्या इंजिनमध्ये स्मार्ट पॉवर (eSP) टेक्नॉलॉजी मिळते. जी सायलेंट स्टार्ट (ACG) स्टार्टर मोटर आणि प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-Fi) सह एकत्रित करते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

हेही वाचा : अभिनेता हृतिक रोशन ने शेअर केला ‘या’ स्पोर्ट्स बाइकचा टिझर, २९ ऑगस्ट रोजी होणार लॉन्च

होंडाची नवीन मोटारसायकल डायमंड प्रकारच्या फ्रेममध्ये येते. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला हायड्रॉलिक शॉक आहेत. यामध्ये १८ इंचाचे अलॉय व्हील्ससह ट्युबलेस टायर्स येतात. ब्रेकिंगचे काम दोन्ही १३० मिमीच्या ड्रमद्वारे केले जाते. यामध्ये सीबीएस ब्रेक सिस्टीम देखील वापरकर्त्यांना मिळणार आहे.

होंडा CD110 Dream डिलक्स मोट्यारसायकलमध्ये DC हेडलॅम्प्स, इन बिल्ट साईट स्टॅन्ड इंजिन इनहिबिटर, टू-वे इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, लाँग सीट (720mm), क्रोम मफलर आणि फाइव्ह-स्पोक सिल्व्हर अलॉय असे फीचर्स मिळतात. खरेदीदार ही मोटारसायकल ब्लॅक विथ रेड, ब्लॅक विथ ब्लू, ब्लॅक विथ ग्रीन आणि ब्लॅक विथ ग्रे अशा चार रंगांमध्ये खरेदी करू शकतात. होंडा २०२३ सीडी ११० ड्रीम डिलक्सवर १० वर्षांची वॉरंटी पॅकेज ऑफर करत आहे.