Honda car discount: होंडा कार्स इंडिया (Honda Cars India) ने आपल्या ग्राहकांना नवीन वर्ष २०२५ निमित्त एक भेट दिली आहे. कंपनीने आपल्या ३ लोकप्रिय गाड्यांवर भरघोस सूट दिली आहे. वर्षाच्या सुरुवातीला विक्रीत चांगली वाढ सुनिश्चित करण्यासाठी, कंपनीने Elevate, 5th Gen City आणि City वर Rs ९०,००० पर्यंत सूट दिली आहे.

एवढेच नाही तर कंपनीने ग्राहकांसाठी आपले उत्कृष्ट वॉरंटी पॅकेजही सादर केले आहे. याशिवाय, ग्राहकांना ७ वर्षांपर्यंत/अमर्यादित किलोमीटरपर्यंतची वॉरंटी एक्स्टेंशन दिली जात आहे. Honda Cars जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्या वाहनांवर किती सूट देत आहे ते जाणून घेऊ या.

Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125
Honda SP 125 vs Bajaj Pulsar N125 : कोणती दुचाकी आहे लयभारी? फिचर्सपासून किंमतीपर्यंत; जाणून घ्या, एका क्लिकवर
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
From Makar Sankranti the locks of luck of these 5 zodiac signs
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार

हेही वाचा… दिशा पाटनीने विकत घेतली नवीन रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, किंमत ऐकून व्हाल अवाक

होंडा सिटी (Honda City)

सवलत: रु ७३,३००

कंपनी होंडा सिटी (5th Generation) च्या सर्व व्हेरिएंटवर ७३,३०० रुपयांपर्यंत सूट देत आहे. Honda च्या कॉम्पॅक्ट सेडानची एक्स-शोरूम किंमत ११.८२ लाख ते १६.३५ लाख रुपये आहे. ही एक उत्तम कार आहे ज्याची डिझाइन सर्वांना आकर्षित करते. कारमध्ये जागा चांगली आहे. या कारची किंमत १२ लाख रुपयांपासून सुरू होते.

होंडा एलिव्हेट (Honda Elevate)

सवलत: रु ८६,१००

जर तुम्ही जानेवारी २०२५ मध्ये होंडा एलिव्हेट एसयुव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या गाडीवर ८६,१०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. Elevate ची एक्स-शोरूम किंमत ११.९१ लाख रुपयांपासून सुरू होते. या SUV मध्ये 1.5L पेट्रोल इंजिन आहे जे 6/7 स्पीड गीअरबॉक्सने सुसज्ज आहे ते एकाच वेळी 17km मायलेज देते. एलिव्हेट ही भारतासाठी एक परिपूर्ण एसयूव्ही आहे.

हेही वाचा… एअरबॅगमुळे ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू! लहान मुलांना कारमध्ये बसवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

होंडा सिटी हायब्रीड (Honda City Hybrid)

सवलत: रु ९०,०००

नवीन वर्षात, होंडा सिटी हायब्रीड च्या सर्व प्रकारांवर एकूण ९०,००० रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. भारतात या कारची किंमत १९ लाख रुपयांपासून ते २०,५५ लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूम आहे. ही एका लिटरमध्ये हायब्रिड मोडमध्ये २६.५ किमी मायलेज देते. यात 1.5L पेट्रोल इंजिन आहे जे 126PS चा पॉवर देते.

नोट: होंडा कारबद्दल वर नमूद केलेल्या सर्व सवलतीच्या ऑफर राज्य आणि शहरानुसार बदलू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या होंडा डीलरशीपशी संपर्क साधू शकता.

Story img Loader