Honda Shine 1.45 Lakh Units Sold In November 2024: दुचाकी वाहनांमध्ये 125 सीसी इंजिन असलेल्या बाईकला मोठी मागणी आहे. परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली या बाईक स्टायलिश लुक आणि आरामदायी राइड सारख्या फीचर्ससह येतात. यामध्येच एक बाईक आहे ती म्हणजे होंडाची शाईन 125.नवीन मॉडेल्स आल्यानंतरही या बाईकने बाजारात आपली पकड कायम ठेवली आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार यावेळीही Honda Shine 125 बाईक्सची सर्वाधिक विक्री झाली आहे. Honda Shine 125 पुन्हा एकदा विक्रीच्या बाबतीत नंबर १ बनली आहे. या बाईकने नोव्हेंबर महिन्यामध्ये १.४५ लाख युनिट्सची विक्री केली आहे.
३० दिवसात विकल्या १.४५ लाख युनिट्स
गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये Honda Shine च्या १,४५,५३० युनिट्सची विक्री झाली होती, तर या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने १,९६,७५८ युनिट्सची विक्री केली होती. या वेळी विक्रीत सुमारे ५०,७५८ युनिट्सची घट झाली असली तरी, तरीही शाईन पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात TVS Raider च्या ३१,७६९ युनिट्सची विक्री झाली होती. या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने ५१,१५३ युनिट्सची विक्री केली होती. याशिवाय, गेल्या महिन्यात Hero Xtreme 125R चे केवळ २५,४५५ युनिट्स विकले गेले होते.
Honda Shine 125 फक्त १३.४३ सेकंदात १०० किमी/ताशी वेग गाठते. ही बाईक ६५ Kmpl चा मायलेज देते.या बाईकची एक्स-शोरूम किंमत ८०,२५० रुपयांपासून सुरू होते. शाइनमध्ये 100cc इंजिन चॉईस करण्याचा ऑप्शन देखील दिली आहे ज्याची किंमत ६५ हजारांपासून सुरू होते.
चार प्रकार आणि आठ रंग पर्याय
ही होंडा बाईक चार प्रकारांमध्ये आणि आठ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये १२३.९४ cc चे पॉवरफुल इंजिन आहे. सुरक्षेसाठी बाईकला समोर डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. बाईकचे एकूण वजन ११४ किलो आहे. या बाईकमध्ये १०.५ लिटरची इंधन टाकी आहे.
सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन
बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे. बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट आणि आरामदायी सीट देण्यात आली आहे. Honda Shine 125 बाजारात बजाज CT 125X, Hero Super Splendor आणि Bajaj Pulsar 125 शी स्पर्धा करते.