सध्या भारतीय बाजारामध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या ननवीन बाइक्सचे मॉडेल लॉन्च करत आहे. तसेच प्रत्येकाला दुचाकी वाहनांची गरज ही लागतच असते. प्रत्येकाकडे किमान एक तरी दुचाकी वाहन असतेच. दुचाकी वाहनांच्या बाइक सेगमेंटमध्ये १२५ सीसी इंजिन असणाऱ्या बाइक्समध्ये खूप मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आज आपण होंडा शाइन १२५ सीसी या बाइकबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचे फीचर्स, किंमत आणि मायलेज याविषयी माहिती पाहणार आहोत. तसेच जर का तुम्हाला होंडा शाइन 125 Disc OBD2 मॉडेल खरेदी करायाचे असेल तर याच्या सोप्या फायनान्स प्लॅनबद्दल देखील माहिती पाहणार आहोत.

इंजिन आणि मायलेज

होंडा शाइनमध्ये कंपनीने १२३.९३ सीसीचे सिंगल सिलेंडर असणारे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन OBD2 नियमांचे पालन करते. हे इंजिन १०.७४ पीएसची ताकद आणि ११ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ गिअरबॉक्ससह जोडण्यात आले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये होंडा शाइन बाइक ६५ किमी धावते असा कंपनीचा दावा आहे. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Car Finance Plan: दरमहिना फक्त १३ हजार द्या अन् घरी घेऊन जा जबरदस्त मायलेज देणारी ८ लाखांची ‘ही’ कार

Honda Shine 125 : किंमत

होंडा शाइन १२५ डिस्क ब्रेक ओबीडीच्या टॉप व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ८३,८०० (एक्सशोरूम, दिल्ली) रुपये आहे. तसेच ही किंमत व रोडमध्ये वाढून ९७,५५७ रुपये इतकी होते.

Honda Shine 125 : फायनान्स प्लॅन

होंडा शाइन १२५ बाइक तुम्ही जर का रोख रक्कमी देऊन खरेदी करण्यासाठी तुमहाला ९७ हजार रुपयांची आवश्यकता असणार आहे. जर का तुमच्याकडे इतके बजेट नसेल तर, तुम्ही ३६ हजारांचे डाऊन पेमेंट करून देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन फायनान्स प्लॅनचा तपशील देणाऱ्या कॅल्क्युलेटरनुसार, जर का तुम्ही ३६ हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला बँक ६१,५५७ रुपयांचे कर्ज देऊ शकते. बँके कर्जाच्या या रकमेवर तुमच्याकडून वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल .बँकेने तुम्हाला कर्ज दिल्यावर पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला १,९७८ रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.

महत्वाची टीप : वर दिलेल्या माहितीच्या आधारे गाडी खरेदी करत असताना कोणताही आर्थिक व्यवहार करताना पूर्ण चौकशी करूनच करावा.