Honda Bikes: भारतात सर्वाधिक मागणी ही दुचाकींना आहे. हिरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि यामाहा अशा अनेक कंपन्या बाजारात आहेत. भारतात ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ (Honda) ही दुसऱ्या क्रमाकांची लोकप्रिय कंपनी आहे. आता जर तुम्हाला उत्तम मायलेज देणारी परवडणारी बाईक घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Honda आपल्या Shine वर मर्यादित काळासाठी सूट देत आहे. जिथे तुम्ही फक्त ३,९९९ रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक तुमच्या घरी नेऊ शकता. या व्यतिरिक्त, तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यावर इतर ऑफर्स देखील मिळतात, चला तर जाणून घेऊया काय आहे ऑफर…

Honda Shine डिस्काउंट ऑफर

केवळ ३,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटशिवाय, तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी कमी व्याज देखील द्यावे लागेल. होंडा शाइन खरेदी करणाऱ्यांना ७.९९ टक्के व्याज द्यावे लागेल. त्याच वेळी, कंपनी ५,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील देत आहे. ही मर्यादित ऑफर केवळ ३१ मार्चपर्यंत वैध आहे.

Toyota camry sedan launched in india comes with 9 airbags safety features know its price, performance and mileage
स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

(हे ही वाचा : Car Discount Offers: जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ नव्या सेडानवर करा तब्बल ७० हजारांची बचत, बुकिंगही सुरु )

कॅशबॅक ऑफर

कॅशबॅक ऑफर किमान ४०,००० च्या व्यवहारांवर लागू आहे आणि SBI क्रेडिट कार्डसह सहा महिने आणि त्याहून अधिक कालावधीच्या EMI व्यवहारांवर याचा लाभ घेता येईल. दरम्यान, कर्जाचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना वित्त योजना ऑफर केली जाईल.

Honda Shine ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींपैकी एक आहे. जानेवारी २०२३ मध्ये, शाईन ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणारी दुसरी मोटरसायकल होती. भारतीय बाजारपेठेत १२५सीसी सेगमेंटमध्ये मोटरसायकल स्पर्धा करते.

Story img Loader