Honda Two Wheeler India लवकरच देशातील दुचाकी क्षेत्रात तीन नवीन प्रोडक्ट लॉंच करण्याच्या तयारीत आहे. यात एक बाईक आणि दोन मोटरसायकलींचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, Honda तीन टू व्हीलर लॉंच करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये स्कूटर प्रथम लॉंच केली जाईल. कंपनी ही स्कूटर १२५ cc सेगमेंटमध्ये लॉंच करेल, ज्यामुळे Honda Activa सोबत या सेगमेंटमध्ये कंपनी आणखी मजबूत होईल.
अहवालानुसार, Honda Motorcycle and Scooter India चे अध्यक्ष Atsushi Ogata यांनी अलीकडेच खात्रीशीर माहिती दिली आहे की, कंपनी लवकरच भारतात तीन प्रोडक्ट लॉंच करणार आहे, ज्यात १२५ cc स्कूटर आणि दोन बाईक आहेत.
१२५ सीसी सेगमेंटमध्ये स्कूटर लॉंच केल्यानंतर कंपनी आपली दुसरी बाईक लॉंच करेल जी १६० सीसी सेगमेंटसाठी तयार केली जात आहे. ही १६० सीसी इंजिन बाईक एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक असू शकते. कारण या सेगमेंटमध्ये कंपनीची कोणतीही बाईक नाही. कंपनी १६० सीसी एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईक लॉंच करू शकते, जी TVS Apache RTR 160 आणि Bajaj Pulsar 160 शी स्पर्धा करेल.
होंडा जी तिसरी बाईक लाँच करणार आहे, ती २५० सीसी ऑफ-रोड अॅडव्हेंचर बाईक असू शकते. कारण २५० सीसी सेगमेंटमध्ये कंपनीची कोणतीही बाईक नाही, त्यामुळे कंपनी ही बाईक लॉंच करू शकते. एकदा या सेगमेंटमध्ये बाईक लॉंच झाल्यानंतर ही २५० सीसी बाईक बजाज डोमिनार आणि हिरो एक्स प्लस सारख्या बाईक्सशी स्पर्धा करेल.
आणखी वाचा : HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये १५० किमी रेंजचा दावा, किंमत जाणून घ्या
या तिन्ही स्कूटर आणि बाईक्सच्या लॉंचबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या तीन बाईक प्रदर्शित करू शकते.
अलीकडेच त्यांची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर Honda Activa चे Honda Activa Premium Edition लॉंच केले आहे. ही स्कूटर सध्याच्या स्कूटरपेक्षा वेगळी बनवण्यासाठी कंपनीने गोल्डन कलरची थीम वापरली आहे.