होंडा पुन्हा एकदा बाजारात एसयुव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या एसयुव्हीच्या लाँचमुळे होंडा पुन्हा एकदा इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्यास सुसज्ज होत असल्याचे दिसत आहे. परंतु यातच कंपनीने दोन फ्लॅगशिप मॉडेल जॅझ (jazz) आणि डब्लूआरवी (WRV) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही वाहनांची विक्रीसंख्या खूप कमी झाली आहे त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. जॅझ मॉडेल बंद केल्यानंतर कंपनी हॅचबॅक विभागातून पूर्णपणे बाहेर पडेल. यापूर्वी कंपनीने सीआरव्ही, बीआरव्ही आणि मोबिलिओ हे मॉडेल बंद केले होते.
आकडेवारी पाहिली तर, ऑगस्ट २०२२ मध्ये डब्लूआरवी मॉडेलच्या केवळ ४१५ गाड्यांची विक्री झाली होती. तर जुलैमध्ये ५२७ गाड्यांची विक्री झाली होती. एका महिन्यात ही सुमारे 38 टक्क्यांची घसरण होती. दुसरीकडे ऑगस्टमध्ये होंडा जॅझच्या केवळ ४४८ गाड्यांची विक्री झाली
आणखी वाचा : ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त बाइक; पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स
मार्केट शेअर घसरला
मॉडेल्सचे प्रोडक्शन सतत बंद पाडणे आणि कंपनीच्या खराब स्थितीमुळे होंडाचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा केवळ २.७९ टक्के आहे. यापूर्वी २०१८-१९ मध्ये हा हिस्सा ५.४४ टक्के होता. मात्र ही परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न कंपनी सध्या करत आहे. याचीच सुरुवात म्हणजे लवकरच लाँच होणारी नवीन एसयूव्ही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार होंडाची नवी एसयूव्ही पुढील वर्षभरात भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. सीआरव्हीच्या प्लॅटफॉर्मवरच ही एसयूव्ही तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे.