Bike Offers: लोकप्रिय कंपनी होंडाची बाइक म्हटलं की, मोटारसायकलप्रेमींसाठी जीव की प्राण असतो. त्यामुळे या गाड्यांबाबत कायमच उत्सुकता असते. होंडा कंपनीने नुकतीच ‘ऑन-न्यू CB300F नेकेड स्ट्रीट-फायटर’ मोटरसायकल भारतात लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत २२६. लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. आता होंडाने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही या नवीन बाईक खरेदीवर तब्बल ५० हजारांची बचत करू शकणार आहोत. चला तर जाणून घ्या या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.
होंडाने ही ऑफर आपल्या CB300F या बाईकवर दिली आहे. नवीन Honda CB300F नेकेड स्ट्रीट फायटर बाईक ऑगस्ट २०२२ मध्ये लाँच करण्यात आली. होंडा CB300F मध्ये २९३.५२ सीसी, सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड, FI इंजिन आहे. हे इंजिन २४.१ बीएचपी आणि २५.६ एनएम टॉर्क जनरेट करते.
(हे ही वाचा : Mahindra SUV: महिंद्राच्या ‘या’ SUV साठी भारतीय झाले वेडे; ठरली नंबर वन )
नवीन ऑफर लागू केल्यानंतर, नवीन Honda CB300F आता KTM Duke 125 आणि Bajaj Dominar 250 पेक्षा स्वस्त आहे. Duke 125 ची किंमत १.७८ लाख रुपये आणि Dominar 250 ची किंमत १.७५ लाख रुपये आहे. नवीन किंमतीवर कंपनीने दिलेली ५०,००० सवलत केवळ स्टॉक टिकेपर्यंत वैध आहे.