देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जण चारचाकी वाहन खरेदी करण्याऐवजी दुचाकी वाहन खरेदी करीत आहेत. तुम्हाला जर स्वस्त किंमतीत चांगला मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. होंडा टू व्हीलर इंडिया 100 सीसी बाईक सेगमेंट हा देशातील सर्वात मोठा असून आता होंडा आपली नवीन आणि परवडणारी 100 सीसी बाईक आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने या बाईकवर काम देखील सुरू केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, ही बाईक कंपनीची सर्वात स्वस्त आणि इंधन कार्यक्षम बाईक असेल आणि ही बाईक थेट Hero Splendor शी स्पर्धा करेल. बाईक्सच्या लॉंचबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये ही बाईक प्रदर्शित करू शकते.

Hero Motocorp Splendour Plus Records Highest Sales In November 2024 Know Features and Price Details
होंडा, बजाज राहिल्या मागे, फक्त ३० दिवसांत २.९४ लाख लोकांनी खरेदी केली ‘ही’ बाईक; ७५ हजाराच्या ‘या’ बाईकवर लोकांच्या उड्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Top 5 best budget cars with 6 airbags
‘या’ आहेत सहा एअरबॅग असलेल्या टॉप ५ सर्वोत्तम बजेट कार, जाणून घ्या किंमत अन् खास फिचर्स
Bajaj Auto Launch New Chetak 35 Series Electric Scooters In India Know Features & Price Details
Bajaj Chetak: भारतीयांचं पहिलं प्रेम! सर्वात स्वस्त आणि मस्त ‘चेतक’ इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये १५३ KM पळणार
Bike Hit Scorpio car shocking accident video
बाईकची स्कॉर्पिओला जोरदार धडक अन् पुढे जे घडलं, ते चमत्कारापेक्षा कमी नाही, VIDEO मध्ये पाहा थरकाप उडवणारा अपघात
Triumph Speed ​​T4
Triumph Speed T4: ट्रायम्फची शक्तीशाली बाईक एवढ्या रुपयांनी झाली स्वस्त, स्टॉक संपण्याआधी ऑफरचा घ्या लाभ
Kawasaki Bikes Discount Offer In December 2024, Know This Details Kawasaki Versys 650, Ninja 650 get massive discounts
Kawasaki Ninja बाईक घेण्याची सुवर्णसंधी; मिळत आहे बंपर डिस्काउंट; निन्जा 650 वर ४५,००० रुपयांची सूट
Top Auto Launched 2024 Year Ender
Top Auto Launched 2024 : महिंद्रापासून ते होंडापर्यंत… २०२४ मध्ये लाँच झाल्या ‘या’ पाच नवीन गाड्या, तुम्हाला कोणती आवडली सांगा?

100 सीसी बाईक्सच्या सध्याच्या श्रेणीबद्दल बोलायचे झाले तर, Hero MotoCorp च्या Splendor Plus ने गेल्या अनेक महिन्यांपासून या सेगमेंटमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. अलीकडे, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, सीईओ आणि महासंचालक अत्सुशी ओगाटा यांनी एका मीडिया संस्थेशी बोलताना खुलासा केला होता की, कंपनीचे भारतात लाँच होणारे पुढील उत्पादन 100 सीसी इंजिन बाईक असेल, ज्याची किंमत खूप कमी आणि मायलेज जास्त असेल.

आणखी वाचा : लवकरच भारतीय बाजारपेठेत महिंद्रा लाँच करणार पहिली इलेक्ट्रिक स्कूटर; रस्त्यांवर चाचणी दरम्यान दिसले नवे मॉडेल, पाहा लुक

होंडाच्या सध्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडे 100 सीसी सेगमेंटमध्ये कोणतीही बाईक नाही तर 110 सीसीमध्ये कंपनीकडे Honda CD 110 Dream आणि Honda Livo आहे. याशिवाय कंपनीकडे १२५ सीसीमध्ये Honda Shine आणि Honda SP १२५ चा पर्याय देखील आहे. यानंतर कंपनीकडे १५० ते ३५० सीसीची मोठी रेंज आहे. Honda 100 सीसी बाईक लाँच केल्यावर, कंपनी भारतातील बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन आपल्या वाहनांमध्ये फ्लेक्स इंधन इंजिन वाहने बनविण्यावर वेगाने काम करत आहे, जेणेकरून वेगाने वाढणार्‍या स्पर्धेदरम्यान ही कामगिरी करणारी पहिली कंपनी ठरेल.

सर्वात स्वस्त आणि मायलेज बाईक बनवण्यासोबतच, होंडा एक इलेक्ट्रिक दुचाकी बनवण्यावर देखील काम करत आहे जी एक इलेक्ट्रिक मोपेड असेल. हे इलेक्ट्रिक मोपेड लांब पल्ल्याचे वजन हलके असेल, जे सुमारे ५० किमी प्रतितास इतका वेग मिळवू शकते. Honda टू व्हीलर इंडियाने अलीकडेच भारतासाठी आपली इलेक्ट्रिक वाहन योजना जाहीर केली असून, कंपनी २०२४ ते २०२५ दरम्यान भारतात आपली दोन इलेक्ट्रिक वाहने लाँच, करेल असे म्हटले आहे.

Story img Loader