नवीन वर्षाच्या सुरुवातीसह, देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा टू-व्हीलर्स आपल्या दुचाकी श्रेणीवर आकर्षक ऑफर देत आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर Activa ते मोटरसायकल Shine या विस्तृत श्रेणीवर उत्तम फायनान्स ऑफर आणल्या आहेत. या अंतर्गत, अत्यंत कमी डाऊन पेमेंटवर दुचाकी फायनान्स मिळण्याव्यतिरिक्त, ग्राहकांना कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल. चला तर जाणून घेऊया काय आहे हा भन्नाट ऑफर.

‘असा’ आहे ऑफर

bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स

Honda च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक फक्त ३,९९९ रुपयांचे डाउन पेमेंट भरून टू-व्हीलर फायनान्सचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहक ५,००० रुपयांचा कॅशबॅक आणि ७.९९ टक्के व्याजदर देखील घेऊ शकतात. ही ऑफर कंपनीच्या निवडक मॉडेल्स आणि ग्राहकांसाठी दिली जात आहे, जी ८ जानेवारी २०२३ पर्यंत वैध आहे. ही सुविधा निवडलेल्या वित्त भागीदारांद्वारे (बँका) प्रदान केली जाईल. अशीही अट आहे की, एका ग्राहकासाठी दोन मॉडेल्स एकत्रितपणे समाविष्ट केले जाणार नाहीत आणि सर्व अॅक्सेसरीज या ऑफरचा भाग नाहीत.

(हे ही वाचा : नवी कोरी चमकणारी Maruti ची ‘ही’ 7 सीटर कार आता २ लाखात होईल तुमची; जाणून घ्या Finance Plan)

Honda Activa ‘अशी’ आहे खास

Honda Activa हे कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. ही स्कूटर ११० cc आणि १२५ cc अशा दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह बाजारात उपलब्ध आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये ACG स्टार्टर मोटर दिली आहे, जी इंजिन किल स्विच तंत्रज्ञानासह येते. ब्रेकिंगसाठी, यात १३०mm ड्रम ब्रेक आणि कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (CBS) देण्यात आले आहे. या स्कूटरची किंमत ७३,१७६ रुपये ते ७६,६७७ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Honda Shine ‘अशी’ आहे खास

जर तुम्ही चांगली परफॉर्मन्स बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Honda Shine हा एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर १२४cc एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन वापरले आहे जे १०.७PS पॉवर आणि ११Nm टॉर्क जनरेट करते. या बाईक किंमत ७७,५९२ रुपये ते ८३,०९२ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहे.

टिप: वाहनांच्या सवलतीबद्दल सांगितले तपशील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आहे. हे देशातील निवडक डीलरशिपवरच उपलब्ध आहे, त्यामुळे ऑफरबद्दल संपूर्ण तपशीलांसाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधा.

Story img Loader