भारतीय बाजारपेठेत सध्या ई स्कुटर्सना प्रचंड मागणी आहे. ऑक्टोबर महिन्यात ई स्कुटर विक्रीमध्ये ओला आघाडीवर होती, तर दिल्लीमध्ये टीव्हीएसने आयक्यूब इलेक्ट्रिक स्कुटरच्या २०० युनिट्सची डिलिव्हरी एका दिवसात केली. यावरून ई स्कुटर्सना किती मागणी आहे याची प्रचिती येते. मात्र, पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या स्कुटरच्या तुलनेत ते कमी खर्चात अधिक मायलेज देत असले तरी त्यांचा वेग पकडण्याचा काळ आणि चार्जिंग कालावधी हे प्रश्न स्कुटर खरेदी करताना उद्भवतातच. मात्र, हॉर्विनची नवीन स्कुटर कदाचित या विषयांवर मात करेल अशी शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रिक बाईक निर्मिती कंपनी हॉर्विनने EICMA 2022 ऑटो शोमध्ये आपल्या पहिल्या मॅक्सी स्कुटरचे पदार्पण केले आहे. Senmenti 0 असे या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे. या स्कुटरला भन्नाट लुक मिळाला आहे. त्याचे डिझाईन इतर स्कुटर्सच्या तुलनेत अनोखे आहे. स्कुटरला शक्तिशाली पावट्रेन मिळाले आहे.

(टीव्हीएसच्या ‘या’ ई स्कुटरला लोकांची प्रचंड पसंती, एका दिवसात २०० स्कुटर्सची डिलिव्हरी)

३०० किमीची रेंज

Senmenti 0 हा स्कुटर ४०० व्ही आर्चिटेक्चरवर आधारित आहे. याचा अर्थ हा स्कुटर ३० मिनिटांमध्ये ८० टक्के चार्ज होऊ शकतो, जे ग्राहकांसाठी सोयिस्कर ठरू शकते. महत्वाचे म्हणजे, या स्कुटरचा सर्वाधिक वेग २०० किमी प्रति तास आहे आणि स्कुटर ० ते १०० किमी प्रति तास वेग केवळ २.८ सेकंदात गाठतो. त्यामुळे हा स्कुटर स्पीडच्या बाबतीत इंधन वाहनाच्या तुलनेत कमकुवत वाटत नाही. स्कुटर सरासरी ८० किमी प्रति तास वेगाने ३०० किमी पर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मिळतात हे फीचर

स्कुटरमध्ये तीन रायडिंग मोड देण्यात आले असून ट्रॅक्शन कंट्रोल, हिटेड सीट, टीएफटी डिस्प्ले, ब्ल्युटूथ कनेक्टिव्हिटी आणि अडजेस्टेबल विंडस्क्रिन देण्यात आले आहे. स्कुटरमध्ये हिल क्लाइम्ब असिस्ट, स्टार्ट आणि रिव्हर्स असिस्टन्स, किलेस गो या फीचर्ससह हिटेड ग्रीप देखील मिळतात.

मोठे अंतर गाठण्यासाठी स्कुटरमध्ये रेंज एक्सटेंडर फीचर देण्यात आले आहे. मात्र, हे फीचर वापरल्यानंतर किती रेंज वाढते याचा खुलासा झालेला नाही. कॅम्पिंग करायचे असल्यास किंवा इतर ई वाहनांसाठी स्कुटरचा बॅटरी पॅक उर्जा स्त्रोत म्हणून काम करू शकतो, असे देखील कंपनीने म्हटले आहे. या फीचर्समुळे हा स्कुटर ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकतो.

(वाहनाच्या केबिनमध्ये ‘या’ वस्तू ठेवण्याचे टाळा, अन्यथा होऊ शकतो अपघात)

सुरक्षेसाठी हे फीचर्स

सुरक्षेसाठी स्कुटरमध्ये ३० सेन्सर्स आणि कॅमेरे देण्यात आले आहेत. ही उपकरणे वेळीच माहिती देऊन सुरक्षा वाढवण्यात मदत करतात. स्कुटरमध्ये अँटि स्लिप प्रणाली, टायर प्रेशर मॉनिटरींग प्रणाली, कोलिजन अलर्ट आणि एबीएस फीचर देण्यात आले आहे.