राज्यात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. यासाठी वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्त्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील १५ टक्के गाड्यांचं २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतर करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हॉ़टेल उद्योगाकडे या धोरणाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. “राज्याचे सर्वसमावेशक इव्ही धोरण मजबूत करण्यासाठी प्रयत्न आहे. इव्ही उत्पादन आणि वापरासाठी महाराष्ट्राचे स्थान अग्रगण्य आहे. एसओपी, पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन यामुळे आम्ही राज्यात इव्हीच्या व्यापक स्वीकृतीसाठी उत्सुक आहोत”, असे राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र या धोरणाची अमलबजावणी खासगी क्षेत्राच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असंही त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा