जर एखादी व्यक्ती बाजारात कार घेण्यासाठी गेली तर त्याच्याकडे पेट्रोल कार, डिझेल कार, हायब्रीड कार, सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कार घेण्याचे पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कार या बऱ्याच काळापासून बाजारात लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, पण आता हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण, पेट्रोल आणि सीएनजीच्या किमती वाढल्यामुळे, या दोघांपैकी कोणता पर्याय निवडावा आणि कोणती कार घ्यायची याबाबत लोकांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर खूपच कमी होते, मात्र यापूर्वी सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे या दोन्ही किमतींमधील तफावत कमी झाली आहे. पण, यानंतरही लोकांसाठी सीएनजी कार घेणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण, सीएनजीच्या किमती कितीही वाढल्या, पण तरीही पेट्रोलच्या तुलनेत ते खूपच कमी आहे.
Car Care Tips for Rainy Season: पावसाळ्यात तुमच्या गाडीची घ्या खास काळजी; ‘या’ टिप्सची होईल मदत
देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०० रुपयांपेक्षा जास्त असून सीएनजीची किंमत ७० रुपयांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत सीएनजीचे दर वाढवूनही ते पेट्रोलच्या किमतीपेक्षा खूपच कमी आहेत. याशिवाय सीएनजी कार जास्त मायलेज देतात. जर पेट्रोल कार १ लिटर पेट्रोलमध्ये १५ किमी चालते आणि तीच कार सीएनजी व्हेरियंटमध्ये असेल, तर सीएनजी व्हेरियंटसह कारचे मायलेज २०-२२ किमी असण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर सीएनजीवर चालणारी वाहने पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी प्रदूषण करतात. या दृष्टिकोनातूनही सीएनजी कार पेट्रोल कारपेक्षा खूप चांगल्या आहेत.