कार विकत घेताना तिच्या आकर्षक डिझाइनपासून मायलेजपर्यंत सर्व बाबी तपासल्या जातात. एकदा का खात्री पटली आणि बजेट बसलं की गाडी दारात उभी राहते. मात्र या व्यतिरिक्तही काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं. ते म्हणजे गाडीची सुरक्षितता. एखादा भीषण अपघात झाला तर गाडीत असताना जीव वाचू शकतो का नाही? याबाबत माहिती असणं आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात कार सुरक्षितता आणखी चांगली करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते अपघातात मृतांची संख्या घटत आहे.
आता बहुतेक कार खरेदीदारांना कार अपघात चाचणीबद्दल माहिती मिळू लागली आहे. कोणत्याही कारची ताकद किंवा सुरक्षितता आता अपघात चाचण्या आणि सुरक्षा रेटिंगद्वारे तपासली जाते. ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (NCAP) द्वारे कारच्या अपघात चाचण्यांद्वारे SECTI रेटिंग दिले जाते. ही सुरक्षा प्रौढांसाठी आणि मुलांसाठी वेगळी असते.
अपघात चाचणी म्हणजे काय?
जवळपास सर्वच कंपन्यांच्या गाड्यांची अपघात चाचणी NCAP द्वारे केली जाते. सर्व कंपन्या त्यांच्या कारच्या प्रत्येक मॉडेल आणि व्हेरियंटवर विविध सुरक्षा वैशिष्ट्ये देतात. यामध्ये एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, सेफ्टी बेल्ट, बॅक सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे. जेव्हा कार अपघात चाचणी केली जाते, तेव्हा या सुरक्षा वैशिष्ट्यांच्या आधारावर गुण दिले जातात.
Lamborghini Huracans: चार हजारांहून अधिक लॅम्बोर्गिनी हुराकन्स गाड्या परत मागवल्या, कारण…
सुरक्षितता गुण प्रक्रिया
सुरक्षा रेटिंगसाठी कारची अपघात चाचणी केली जाते. यासाठी मानवासारखे प्रतिकात्मक पुतळे वापरले जातात. चाचणी दरम्यान, वाहन एका निश्चित वेगाने आदळली जाते. यादरम्यान कारमध्ये ४ ते ५ प्रतिकात्मक पुतळ्यांचा वापर केला जातो. मागच्या सीटवर मुलांचा प्रतिकात्मक पुतळा बसवला जातो. हे मुलांची सुरक्षितता सीटवर निश्चित केली जाते.
सुरक्षितता गुणांमुळे कारची सुरक्षितता कळते
अपघात चाचणीनंतर कारच्या एअरबॅग्ज काम करतात की नाही. प्रतिकात्मक पुतळ्यांचे किती नुकसान झाले? कारची इतर सुरक्षितता वैशिष्ट्ये कितपत योग्य आहेत? या सर्वांच्या आधारे गुण दिले जाते. हे गुण ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्यास मदत करते.