Maruti WagonR CNG Car Loan Down Payment EMI Details: देशातील कार क्षेत्रात सर्वाधिक मागणी असलेल्या कारमध्ये कमी बजेटच्या हॅचबॅक गाड्यांना दीर्घ मायलेजसाठी प्राधान्य दिले जाते. आज आपण हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार मारुती वॅगनआर बद्दल बोलत आहोत, जी आपल्या कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कारच्या यादीत शीर्षस्थानी आहे. मार्केटमध्ये WagonR LXI CNG आणि WagonR VXI CNG या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून याची किंमत ६.४२ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. पण जर तुमचे बजेट कमी असेल किंवा तुमच्याकडे एकाच वेळी पैसे भरण्याइतके पैसे नसतील, तर तुम्ही ही कार कमी किमतीत खरेदी करण्याचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Maruti Suzuki WagonR VXI CNG EMI

मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी किंमत, सुलभ वित्त, डाउनपेमेंट आणि ईएमआय तपशीलांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती वॅगन आर एलएक्सआय सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ६.४२ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत ७,२०,१६६ रुपये आहे. जर तुम्ही WagonR LXI CNG ला रु. १ लाख डाउनपेमेंट आणि ९ टक्के व्याजदराने वित्तपुरवठा केला तर तुम्हाला ६,२०,१६६ रुपयांचे कार कर्ज मिळेल.

(आणखी वाचा : Sports Car, Super Car आणि Hyper Car कोणती आहे तुमच्यासाठी सर्वोत्तम? जाणून घ्या सविस्तर)

जर कर्जाचा कालावधी ५ वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील ६० महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला १२,८७४ रुपये EMI म्हणजेच मासिक हप्ता भरावे लागतील. मारुती वॅगनआर सीएनजीच्या सर्वात स्वस्त व्हेरिएंटसाठी फायनान्स करण्यासाठी तुम्हाला ५ वर्षांमध्ये १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.

Maruti Suzuki Wagon R VXI CNG EMI option

Maruti Suzuki WagonR VXI ची भारतात एक्स-शोरूम किंमत ६.८६ लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत ७,७३,२०७ रुपये आहे. जर तुम्ही मारुती WagonR VXI CNG ला १ लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह वित्तपुरवठा केला तर तुम्हाला ६,७३,२०७ रुपये कर्जाची रक्कम मिळेल.

जर व्याज दर ९ टक्के असेल आणि कर्जाची मुदत ५ वर्षांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी दरमहा १३,९७५ रुपये EMI म्हणून भरावे लागतील. मारुती WagonR VXI CNG ला फायनान्स केल्याने तुम्हाला ५ वर्षांमध्ये १.६५ लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much emi on buying maruti wagonr cng by making a down payment of rs 1 lakh see full details pdb