Tyre Pressure : आज अनेक जण रोजच्या प्रवासासाठी दुचाकी चालवतात. दुचाकी चालवणे अधिक सोयीस्कर वाटते. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दुचाकीचे महत्त्व वाढत आहे. वाहतूक कोंडीपासून आणि लहान मोठ्या रस्त्यांवरून प्रवास करताना दुचाकी अधिक फायदेशीर ठरते. आजच्या या जगात, दुचाकीमध्ये अनेक बदल आणि नवीन फीचर्स दिसून येतात. सुरक्षेशी संबंधित अनेक नवीन फीचर्स दुचाकीमध्ये अपडेट केलेले दिसून येतात. (How often should we check our tyre pressures read bike care tips)

खूप जास्त वाहतूक कोंडी आणि लहान रस्त्यांमुळे अनेक दुचाकीच्या टायरमधील एअर प्रेशर कमी झालेले दिसून येते. याचा थेट परिणाम मायलेजवर पडतो. त्यामुळे एका ठराविक काळानंतर टायर प्रेशर चेक करणे महत्त्वाचे आहे. यामुळे दुचाकी चांगली मायलेज देते. तुम्ही दर किती दिवसांनी तुमच्या दुचाकीचा टायर प्रेशर चेक करता? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत तसेच टायर प्रेशर तपासण्याचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत.

दुचाकीचा टायर प्रेशर किती दिवसांनी तपासावा? (How often should we check our tyre pressures)

आपण ७ ते १० दिवसांमध्ये एकदा टायर प्रेशर तपासणे आवश्यक आहे. याशिवाय काही लोक नियमित दुचाकीने दूरचा प्रवास करतात आणि रस्त्यात खराब रस्त्यावरून जावे लागते त्यांनी आठवड्यातून एकदा दुचाकीचे टायर प्रेशर तपासावे. यामुळे तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.

दुचाकीचे टायर प्रेशर योग्य असेल तर इंधनची कार्यक्षमता वाढते. ज्यामुळे तुमची दुचाकी चांगली मायलेज देऊ शकते. याशिवाय योग्य टायर प्रेशर असल्याने रस्त्यावर दुचाकीची ग्रिप चांगली राहते आणि गाडी घसरून पडण्याचा धोका कमी होतो.

याशिवाय टायरमध्ये कमी प्रेशर असेल तर टायर फुटू शकतो त्यामुळे दुचाकीमध्ये कंपनीने सुचविलेल्या पीएसाय नुसार हवा भरावी.

जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल तर दुचाकीचे टायर प्रेशर तपासून घ्यावे ज्यामुळे तुम्ही सुरक्षित प्रवास करू शकता.

Story img Loader