Pay As You Drive Insurance plans : ‘पे ॲज यू ड्राईव्ह (PAYD) हा कार विम्याचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये प्रीमियम निश्चित वार्षिक इनकमप्रमाणे नाही तर तुमच्या कारने व्यापलेल्या अंतराच्या आधारे मोजले जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, जर तुम्ही कमी अंतर गाडी चालवली तर तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागेल. PAYD ड्रायव्हर्सना वैयक्तिक आणि परवडणारा विमा ऑप्शन प्रदान करते, जे सुरक्षित आणि अधिक जबाबदार ड्रायव्हिंग सवयींना प्रोत्साहन देते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते कसे काम करते? (Pay As You Drive and How You Drive Car Insurance)

किलोमीटर डिक्लेरेशन : पॉलिसी कालावधीत तुम्ही गाडी किती किलोमीटर चालवू शकता याचा अंदाज दिलेला असतो. यात तुम्हाला योग्य स्लॅब निवडायचा असतो.

१) टेलीमॅटिक्स टेक्नॉलॉजी : हे डिव्हाइज वेग, अंतर, दिवसाची वेळ आणि ड्रायव्हिंग पॅटर्नसह ड्रायव्हिंगच्या विविध पैलूंवरील डेटा गोळा करते. हा डेटा विमा कंपन्यांना जोखमीचे अचूक मूल्यांकन करण्यास मदत करतो.

२) प्रीमियमची कॅलक्युलेशन : विमा कंपनी तुम्ही निवडलेल्या किलोमीटरच्या स्लॅबवर आधारित तुमच्या प्रीमियमची गणना करते.

3) ट्रॅकिंग : तुमच्या वाहनाचे मायलेज टेलिमॅटिक्स डिव्हाइस किंवा तुमच्या स्मार्टफोन ॲपद्वारे ट्रॅक केले जाते.

४) प्रीमियम ॲडजस्टमेंट : पॉलिसी कालावधीच्या शेवटी, तुमच्या वास्तविक मायलेजची तुलना तुम्ही नोंद केलेल्या मायलेजशी केली जाते. जर तुम्ही कमी गाडी चालवली असेल तर तुम्हाला परतावा मिळेल. जर तुम्ही खूप गाडी चालवली असेल तर तुम्हाला अतिरिक्त प्रीमियम भरावा लागेल.

PAYD विम्याचे फायदे (Pay As You Drive Insurance Benefits)

१) जर तुम्ही कमी गाडी चालवली तर तुम्ही तुमचा विम्याचा हप्ता मोठ्या प्रमाणात कमी करू शकता, यामध्ये तुम्ही वापरलेल्या कव्हरेजसाठीच पैसे देता.

२) काही विमा कंपन्या सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी सवलत देतात. टेलिमॅटिक्सच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेतला जातो.

३) काही PAYD पॉलिसी फ्लेक्सिबल कव्हरेजचा पर्याय देतात, ज्यामुळे पॉलिसीधारकांना त्यांच्या ड्रायव्हिंग सवयी आणि गरजांवर आधारित कव्हरेजचे विविध स्तर निवडता येतात.

Read More Auto News : Maserati च्या Grecale SUV ची भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एन्ट्री; २१ स्पीकर्स, आठ गिअर्ससह मिळणार ‘हे’ दमदार फीचर्स

४) PAYD कमी ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देऊ शकते, ज्यामुळे उत्सर्जन कमी होईल आणि वातावरण स्वच्छ ठेवण्यात मदत होईल.

PAYD विम्याचे तोटे

१) वाहनाचे स्थान आणि वाहन चालवण्याच्या सवयींचे सतत निरीक्षण केल्याने प्रायव्हसीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

२) जे लोक वारंवार वाहन चालवतात, त्यांना पारंपरिक विमा पॉलिसीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील.

३) क्लेमच्या बाबतीत, प्रवास केलेले अंतर आणि इतर टेलिमॅटिक्स डेटा व्हेरिफाय करताना समस्या उद्भवू शकतात.

४) टेक्नोलॉजीवर अवलंबून राहणे याचा अर्थ असा आहे की, टेलिमॅटिक्स डिव्हाइज किंवा ॲपमध्ये कोणताही बिघाड झाल्यास पॉलिसी आणि प्रीमियमच्या आकडेवारीत गडबड होऊ शकते.

PAYD हे भारतातील एक नवीन मॉडेल आहे आणि विमा कंपन्या आणि ग्राहक त्याच्या फायद्यांबद्दल अधिक जागरूक होत असल्याने ते अधिक स्वीकारले जात आहे. या नाविन्यपूर्ण विमा मॉडेलशी जुळवून घेण्यासाठी नियामक फ्रेमवर्कदेखील तयार केले जात आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How pay as you drive insurance best for you find out here transforming vehicle coverage sjr