सध्या प्रत्येकाकडे गाडी असते. कोणाकडे फोर व्हिलर, टू-व्हिलर तर कोणाकडे ट्रक अशी वाहने असतात. म्हणजेच प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार वाहन घेऊन वापरत असतो. भारतामध्ये वाहन चालवत असताना अधिकृत लायसन्स असणे आवश्यक आहे. सर्व वाहनांसाठी वाहन चालवण्याचे लायसन्स हे वाहनाच्या प्रकारानुसार वर्गीकृत करण्यात आले आहे. दुचाकी, हलकी मोटार वाहने, जड मोटार वाहने , व्यावसायिक आणि मोठी वाहने यासारख्या वाहनांचा समावेश आहे.
भारतामध्ये अधिकृत म्हणजेच वैध ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या लोकांना परदेशामध्ये प्रवास करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो तेव्हा तिथले ड्रायव्हिंगचे नियम देखील बदलतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट म्हणजेच IDP . जे तुम्हाला परदेशात प्रवास करताना कोणत्याही त्रासाशिवाय ड्रायव्हिंग करण्याचे स्वातंत्र्य देते. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (IDP) ची माहिती अनेकांना असते. मात्र त्यांच्याकडे याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसते. जसे की ते कशासाठी वापरले जाते आणि कसे बनवले जाते. भारतातील RTO च्या सर्व प्रक्रिया डिजिटल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये IDP देखील समाविष्ट आहे. जर का तुम्ही परदेशामध्ये प्रवास करण्याची तयारी करत असाल आणि तिथे तुम्हाला ड्रायव्हिंग करायचे असेल तर भारतात आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात.
१.
सर्वात पहिली गोष्ट जी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे ती म्हणजे IDP साठी अर्ज करण्याआधी तुमच्याकडे भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे किंवा अधिकृत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. या दोन्ही अटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला फॉर्म 4A भरावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या विभागामध्ये असणाऱ्या आरटीओ ऑफिसला लिहावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये तुम्ही ज्या देशात जाणार आहेत त्याचे डिटेल्स, तिथे राहण्याचा कालावधी सुद्धा भरावा लागणार आहे.
२.
तुमच्या विभागातील आरटीओ ऑफिसमध्ये फट भरून दिल्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी तुम्हाला तुमच्या पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि इतर आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स आपल्या अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्ससह द्यावी लागेल.
सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला IDP प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे शुल्क भरावे लागणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ कामाच्या दिसांमध्ये IDP तुमच्या निवासी पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवला जाईल.
जर का तुम्ही आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसाठी अर्ज करत असाल तर तुमच्या परदेशातील प्रवास सुरू होण्याआधी काही दिवस अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करावी. जेणेकरून या प्रक्रियेमध्ये उशीर होणे किंवा IDP पोस्टाने येण्यास विलंब होणे यासारख्या अडचणी निर्माण होऊ नयेत. तसेच तुम्हाला हे देखील माहिती असणे आवश्यक आहे भारतातून घेतलेले IDP १ वर्षासाठी किंवा देशांतर्गत असलेले लायसन्सची मुदत संपण्यापर्यंत वैध आहे. जे वापरकर्ता अवध्यक कागदपत्रांच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने IDP अपडेट करू शकतो.