Puncture Fraud: लोकांना फसवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जात असते आणि नवनव्या पद्धतीमुळे लोक देखील त्या जाळ्यात अडकून आपलं आर्थिक नुकसान करवून घेत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहिले पाहिजे. गाडीच्या व्यवहारातही असंच असत. ऐन वेळी आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा आपल्या गाडीचे टायर पंक्चर होते. अशावेळी पंक्चर दुरुस्त करण्यासाठी आपण मेकॅनिकडे धावत जातो आणि मेकॅनिक आपल्याला जास्त पैसे सांगून लुबाडण्याचा प्रयत्न करतो. ही फसवणूक कशी टाळता येईल, यावर आज आम्ही तुम्हाला सोप्या देणार आहोत. चला तर जाणून घेऊया कशी टाळाता येईल फसवणूक.
टायरचे प्रकार
गाड्यांमध्ये ट्यूब टायर आणि ट्यूबलेस टायर अशा दोन पद्धतीचे टायर्स असतात. ट्यूब टायरचे पंक्चर काढणे अधिक मेहनती काम आहे. परंतु ट्यूबलेस टायरचे पंक्चर काढणे खूप सोपे आहे. ट्युबलेस टायरचा आणखी एक फायदा असा, की या टायरमध्ये पंक्चर झाले तरीही हवा जायला काही दिवस लागतात. ट्यूबलेस टायरचे वैशिष्ट्य म्हणजे, टायरमध्ये ट्यूब बाहेर काढण्याची गरज नसते. तरी पंक्चर काढणारे मेकॅनिक अधिक नफा कमवण्यासाठी याचे पैसे अधिक घेतात.
(हे ही वाचा: तुमच्याही कारचा टायर पंक्चर झालायं? मग जाणून घ्या ‘टायर पंक्चर रिपेअर किट’ कसं काम करतं?)
‘अशी’ होते फसवणूक
जे पंक्चर काढायला ५-२५ रुपये सुद्धा खर्च येत नाही त्याचे हे लोक १००-१०० रुपये घेतात. आपण त्यांचे निरीक्षण करत नसल्यास ते टायरमध्ये एका पंक्चर ऐवजी आपल्याला दोन किंवा तीन पंक्चर दाखवतात. आपल्याकडून जास्त पैसे उकरतात. मुळातच, जर तुमच्या गाडीला ट्यूबलेस टायर असेल तर पंक्चरवाल्याकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः सुद्धा गाडीचे पंक्चर काढू शकता. तुम्ही स्वतः पंक्चर काढणे हे सोपेच नव्हे तर फायद्याचे सुद्धा आहे.
ट्यूबलेस टायरचे पंक्चर रिपेयर किट १५० रुपयाच्या दरात बाजारात मिळते. एकदा हे किट विकत घेतल्यानंतर किमान १० पंक्चर काढेपर्यंत यात तुम्हाला कोणतीही नवीन सामग्री घ्यावी लागणार नाही. भले तुमच्या किट मधील १० स्ट्रिप्स संपल्या तरी त्या ५ रुपयाला १ प्रमाणे मिळतात. ज्या अगदीच स्वस्त आहेत.
(हे ही वाचा: Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर)
‘अशी’ टाळा फसवणूक
- सर्वप्रथम तर तुम्ही ट्यूबलेस टायर पंक्चर किट खरेदी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही गाडीत पोर्टेबल एयर पंप सुद्धा ठेवा. ज्याची किंमत फक्त ३०० ते ४०० रुपये आहे. हा आपात्कालिन परिस्थितीमध्ये खूप उपयोगी पडतो.
- हा एअर पंप जवळ बाळगणे खूप उपयोगी ठरू शकते. तुमची गाडी मोठ्या प्रवासादरम्यान पंक्चर झाली तर हायवेवरील पंक्चर वाल्याकडे जाणे, खिशाला कात्री लावण्यासारखे ठरेल.
- हायवेला जर गाडी पंक्चर झालीच तर अजिबात हायवेवरील पंक्चर वाल्यांकडे पंक्चर काढू नये, फक्त हवा भरून घ्यावी, अशा कंडिशनमध्ये सुद्धा गाडी १०० किलोमीटर जाऊ शकते.