ड्रायव्हिंग लायसन्स एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. विना ड्राइव्हिंग लायसन्स तुम्ही दुचाकी, चारचाकीसह इतर कोणतेही वाहन चालवू शकत नाही. ज्याप्रमाणे आधार, पॅन कार्ड सारख्या ओळखपत्रांवर पत्ता असतो. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सवर देखील पत्ता, जन्म तारीख, नाव इत्यादी सर्व माहिती असते. इतर ओळखपत्रावरील आणि ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता वेगवेगळा असल्यास अनेकदा समस्या निर्माण होते व पत्ता बदलण्यासाठी आरटीओ ऑफिसच्या चक्करा माराव्या लागतात अथवा एखाद्या एंजटला पैसे देऊन काम करावे लागते.

आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता बदलायचा असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही धावपळ न करता व अतिरिक्त पैसे न खर्च करता लायसन्सवरील पत्ता बदलू शकता. आता घरबसल्या देखील हे काम करणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तसेच, काही कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

Bangladeshi nationals residing in Pimpri issued passports from Goa Pune news
पिंपरीत वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी गोव्यातून काढले पासपोर्ट
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Pedestrian day Pedestrian Policy Pune Municipal Corporation pune news
पदपथांंअभावी पादचारी ‘दीन’
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Despite the Pedestrian Safety Policy non implementation forces pedestrians to walk on roads
पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव

 ड्रायव्हिंग लायसन्सवर पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्समधील पत्ता बदलायचा असेल, तर प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. खालील आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी पहा.

फॉर्म 33 मध्ये अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र, नवीन पत्त्याचा पुरावा, वैध विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, फायनान्सरचे ना हरकत प्रमाणपत्र (हायपोथेकेशनच्या बाबतीत), पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि फॉर्म 61 (जसे लागू असेल). चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंटची प्रमाणित प्रत, मालकाच्या स्वाक्षरीची ओळख द्यावी लागेल.

(हे ही वाचा : मारुतीची ‘ही’ कार बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच तब्बल ५३ हजार लोकांनी खरेदीसाठी लावल्या रांगा!)

घरबसल्या असा बदला पत्ता

 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

 आता तुमचे राज्य निवडा, त्यानंतर Apply Online वर क्लिक करा आणि नंतर Services on Driving License हा पर्याय निवडा.

 डायलॉग बॉक्समधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि Continue बटणावर क्लिक करून पुढे जा.

 जुना ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख, राज्य, आरटीओ इत्यादी तपशील काळजीपूर्वक भरा आणि Proceed बटणावर टॅप करा.

 आता तुम्हाला सर्व बॉक्स भरावे लागतील आणि तुमचा कायमचा पत्ता सत्यापित करण्यासाठी ‘पुढे जा‘ बटणावर क्लिक करा.

 आता सूचीमधून ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसमध्ये बदल निवडा.

 नवीन ड्रायव्हिंग लायसन्समध्ये तुम्हाला बदलायचा असलेला पत्ता भरा आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

 दुसर्‍या पानावर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल, तुम्ही पुढील वापरासाठी तो प्रिंट करू शकता. त्यानंतर Next बटणावर क्लिक करा.

 आता येथे तुम्हाला जुने ड्रायव्हिंग लायसन्स आणि अ‍ॅड्रेस प्रूफची प्रत अपलोड करावी लागेल.

 त्यानंतर शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

– एकदा तुम्हाला अर्ज क्रमांक मिळाल्यावर, खाली जा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि पुढे जा बटणावर क्लिक करा. फाइल निवडा, अधिक दस्तऐवज अपलोड करा वर क्लिक करा आणि पुढील बटणावर टॅप करा.

 पैसे भरा, पर्याय निवडा आणि पेमेंट गेटवेपैकी एक निवडा आणि पेमेंट करा.

Story img Loader