10 Year Old Diesel Vehicles News in Delhi : दिल्ली सरकारने १ जानेवारी रोजी १० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच राज्य परिवहन विभागाने ग्राहकांना त्यांच्या जुन्या गाड्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बदलण्याचा पर्याय आणला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या जुन्या वाहनांना ईव्हीमध्ये रूपांतरित करण्यासाठी इलेक्ट्रिक किट्सच्या सहा उत्पादकांना पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत आणखी उत्पादकांना पॅनेलमध्ये टाकले जाण्याची शक्यता आहे.
इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) द्वारे मान्यताप्राप्त उत्पादकांकडे दोन, तीन आणि चार चाकी वाहनांसाठी विविध बॅटरी क्षमता आणि इंधनाचे प्रकार आहेत. ICAT ही देशातील आघाडीची चाचणी प्रमाणन, संशोधन आणि विकास एजन्सी आहे.
तुम्हाला किती रेंज मिळेल ?
Etrio Automobile चे इलेक्ट्रिक किट, दिल्ली सरकारने पॅनेल सामील केलेल्या उत्पादकांपैकी Etrio Automobile (एट्रियो ऑटोमोबाइल) च्या इलेक्ट्रिक किटचा वापर पेट्रोल आणि डिझेल दोन्ही चारचाकी वाहनांसाठी केला जाऊ शकतो. १७.३ किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह १०६ किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल. दुसरीकडे, बूमा इनोव्हेटिव्ह ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स रिन्यूएबल पेट्रोल टू-व्हीलरसाठी इलेक्ट्रिक किट ऑफर करेल. हे २.०१६ kW क्षमतेची बॅटरी आणि ६५.८६ किमी पर्यंतची रेंज मिळणार आहे.
किती खर्च येईल ?
तज्ज्ञांच्या मते, डिझेल आणि पेट्रोलच्या जुन्या कारचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी बॅटरीची क्षमता आणि श्रेणीनुसार ३ लाख ते ५ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पण, बॅटरीच्या प्रकारावर आणि उत्पादकांच्या आधारावर, दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांच्या रेट्रोफिटिंगची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल.
आणखी वाचा : Hero MotoCorp: जबरदस्त ऑफर!, एक रुपयाही खर्च न करता तुमची आवडती बाईक घरी घेऊन जा, फक्त हे काम करावं लागेल
पॅनच्या यादीमधील उत्पादक
Atrio आणि Booma व्यतिरिक्त, 3EV इंडस्ट्रीज (3EV Industries), झीरो 21 रिन्यूएबल एनर्जी सॉल्यूशंस (Zero 21 Renewable Energy Solutions) आणि वीईएलईवी मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (VELEV Motors India Pvt Ltd) यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
आणखी वाचा : Traffic Rule: ट्रॅफिक चलान जारी केल्यानंतरही पैसे भरावे लागणार नाहीत! हा महत्त्वाचा नियम एकदा वाचाच!
दिल्ली सरकारचा आदेश
वापरलेल्या कारला ईव्हीमध्ये रूपांतरित करण्याच्या पर्यायामुळे ग्राहकांना दिल्ली एनसीआरमध्ये १० वर्षे आणि १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) घातलेल्या बंदीमुळे प्रभावित न होण्यासाठी मदत होणार आहे. एनजीटीच्या बंदीचे पालन करताना, दिल्ली सरकार पुढील वर्षी १ जानेवारी रोजी १० वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करेल. इतर राज्यांमध्ये या वाहनांची पुनर्नोंदणी करण्यासाठी ते ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देखील जारी करेल.
आणखी वाचा : Car Service: Free कार सर्व्हिससह मिळणार आणखी बरेच फायदे, जाणून घ्या काय आहे या कंपनीचं स्मार्ट केअर क्लिनिक
किती वाहनांवर परिणाम होईल ?
दिल्ली NCR मध्ये १.५ लाख डिझेल वाहने आहेत, ज्यांना १० वर्षे पूर्ण झाली आहेत. तर १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल वाहनांची संख्या २८ लाखांहून अधिक आहे.