तुम्ही नवीन ठिकाणी कायमस्वरूपी राहायला गेले असल्यास किंवा तुमच्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलू इच्छित असल्यास, एक सोपा मार्ग आहे. मोटार वाहन कायदा १९८८ नागरिकांना मोटार वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर म्हणजेच आरसीवर मालकाचा निवासी पत्ता बदलण्याची परवानगी देतो. १४ दिवसांच्या आत घराच्या पत्त्यातील बदलाच्या रेकॉर्डिंगची विनंती करू शकता. तुमच्या वाहनाच्या आरसीवर तुमचा पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी या बाबींचे पालन करा.

वाहन आरसीवरील पत्त्याचे तपशील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने बदलले जाऊ शकतात. हा आरसीवरचा पत्ता बदलण्यापूर्वी काही कागदपत्रे आवश्यक आहेत आणि ती खालीलप्रमाणे :

१. फॉर्म ३३
२. नवीन पत्त्याचा पुरावा
३. नोंदणी प्रमाणपत्र
४. पीयूसी प्रमाणपत्र
५. वैध विमा
६. वित्तपुरवठादार कंपनी वा बँकेने (फायनान्सर) जारी केलेली एनओसी (वाहनावर कर्ज असल्यास)
७. पॅन कार्डची प्रमाणित प्रत किंवा फॉर्म ६० आणि फॉर्म ६१
८. स्मार्ट कार्ड फी पावती
९. चेसिस आणि इंजिन पेन्सिल प्रिंट
१०. मालकाची स्वाक्षरी

आरसीवर ऑनलाइन पत्ता कसा बदलायचा?

१. सर्वप्रथम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहन ई-सेवांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२. लॉगिन बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे तुमचा User ID, पासवर्ड, सुरक्षा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा.

३. Online Service वर क्लिक करा. वाहनसंबंधित सेवा निवडा.

४. तुमचा वाहन नोंदणी क्रमांक आणि चेसिस क्रमांकाचे शेवटचे ५ अंक एंटर करा. जनरेट OTP बटणावर क्लिक करा.

५. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठविलेला OTP एंटर करा आणि सबमिट करा. RC पर्यायामध्ये पत्ता बदला पर्याय निवडा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

६. डावीकडील मेनूवरील RC पर्यायातील ‘पत्ता बदला’वर क्लिक करा. सर्व तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

७. Service Details टॅब अंतर्गत उपस्थित विमा पॉलिसी पर्याय भरा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करा. अपलोड डॉक्युमेंट्स पर्यायावर क्लिक करा.

८. सेवा तपशील टॅब अंतर्गत अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करा. स्लॉट उपलब्ध आहे ती तारीख निवडा. BOOK NOW बटणावर क्लिक करा. शुल्क तपशील पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक तपशिलांसह पेमेंट करा. पेमेंट गेटवे निवडा आणि सुरू ठेवा हे बटण दाबा.

हेही वाचा >> Kawasaki Ninja 300: कावासाकी ३०० चं मेड-इन-इंडिया मॉडेल लाँच; जबरदस्त लूक आणि किंमत आहे कमी…

९. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आरसीवरील पत्ता बदलण्याच्या पायऱ्या राज्यानुसार बदलू शकतात आणि अधिक तपशिलांसाठी RTO वेबसाइटला भेट द्या.