उन्हाळ्यात तीन महिन्यांच्या असह्य उष्णतेनंतर गेल्या काही दिवसांत मान्सूनपूर्व सरींनी देशातील अनेक भागांतील लोकांना थोडासा दिलासा दिला आहे. पण पावसाळ्यात लोकांना नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत:दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यातून वाहन चालवणे हे मोठे त्रासदायक काम आहे. म्हणूनच पूरग्रस्त स्थिती असलेल्या किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहनाचे कोणतेही नुकसान न करता सुरक्षितपणे कसे चालवावे याबाबत काही सोप्या गोष्टी सुचवल्या आहेत.

१. पाण्याने भरलेले रस्त्याने जाणे टाळा

सर्वसाधारणपणे, पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवणे टाळा जिथे पाण्याची पातळी कारच्या बॉडीवर्कच्या सर्वात खालच्या भागापेक्षा जास्त आहे, म्हणजे, समोरच्या बंपरच्या तळाशी किंवा दरवाजाच्या खालपर्यंत असेल अशा ठिकाणी वाहन घेऊन जाणे टाळा. बऱ्याच गाड्या जास्त पाण्यातून जाऊ शकत नाहीत त्यामुळे इंजिन खराब होऊ शकते. पाणी एक्झॉस्ट पाईप आणि रेडिएटरमध्ये जाऊ शकते, त्यामुळे समस्या निर्माण होतात. मुसळधार पावसानंतर पूरग्रस्त भागात, विशेषतः भुयारी मार्गातून वाहन चालविणे टाळणे चांगले.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना

२. हळूहळू चालवत रहा

जर वाहन चालवताना तुम्ही भरपूर पाणी साचलेल्या ठिकाणी अडकलात तर हळू हळू वाहन चालवत राहा, पाण्यात थांबू नका, कारण ते तुमच्या कारच्या इंजिनमध्ये जाऊ शकते. वेग वाढवू नका किंवा खूप जोरात ब्रेक लावू नका, कारण यामुळे तुमची कार थांबू शकते. त्याऐवजी, कमी गियरमध्ये (जसे की पहिला किंवा दुसरा गीअर) वाहन हळू हळू चालवा. हे तुम्हाला पाण्यातून सुरक्षितपणे जाण्यास मदत करेल.”

हेही वाचा –पावसाळ्यात कारची चमक आणि रंगाची घ्या विशेष काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

३. इंजिन बंदल पडल्यास गाडी पुन्हा सुरु करू नका

जर तुम्ही साचलेल्या पाण्याच्या मधोमध अडकला आहात आणि तुमच्या वाहनाचे इंजिन बंद पडले तर पुन्हा सुरु करू नका. पाण्यामुळे इजिंन खराब होऊ शकतो कारण कनेक्टिंग रॉड्सवक जास्त दाब येतो आणि आणि पाण्याच्या दबावामुळे रीस्टार्ट करताना ते सहजपणे तुटू शकतात. या व्यतिरिक्त, जर पावसाचे पाणी मोटरपर्यंत पोहोचले असेल, तर ते इंजिनला गंभीरपणे हानी पोहोचवू शकते आणि दुरुस्तीसाठी खूप पैसे खर्च करू शकतात. त्याऐवजी, मदत येण्याची प्रतीक्षा करा किंवा तुमची कार कोरड्या जमिनीवर सुरक्षितपणे हलवण्यासाठी प्रशिक्षित व्यवसायिंकाची मदत घ्या.”

उत्तम उपाय म्हणजे बाहेर पडणे आणि वाहनाला पूर नसलेल्या भागात वाहन ढकलत न्या. एकदा तुम्हाला खात्री पटली की एक्झॉस्ट आणि इतर अंतर्गत भागातून पाणी बाहेर पडले आहे, त्यानंतर कार रीस्टार्ट करणे सुरक्षित आहे.

४. घाबरू नका, शांत रहा

कार तिच्या क्षमतेपेक्षा जास्त पाण्यात गेल्यास, उभ्या असलेल्या पाण्याचा दाब दरवाजा उघडण्यापासून रोखू शकतो. जर दरवाजा अडकला असेल तर घाबरू नये आणि शांत राहावे. सर्वात प्रथम लक्षात ठेवा की पाण्याची पातळी वाढवण्यापूर्वी खिडक्या खाली करा आणि कारमधून बाहेर पडा. जर ते शक्य नसेल, तर खिडकीचे काच फोडण्यासाठी त्यांना काही तीक्ष्ण किंवा जड वस्तू शोधा.

हेही वाचा – पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी

५. वाहन धोक्याच्या क्षेत्राबाहेर गेल्यावर ब्रेक वापरा

एकदा वाहन पुराच्या पाण्यातून बाहेर पडल्यानंतर, त्यातील ओलावा साफ करण्यासाठी तुमचे ब्रेक लावा आणि तुम्हाला ते वापरण्याची गरज पडण्यापूर्वी ते प्रभावीपणे काम करत असल्याची खात्री करा. पाणी वाढल्याने ब्रेक निकामी होऊ शकतात आणि शेवटी धोकादायक ड्रायव्हिंग परिस्थिती निर्माण होऊ शकते. जास्तीचे पाणी बाहेर काढल्याने, ते कारला सुरळीतपणे पुढे जाण्यास आणि व्यवस्थित कार चालवता येईल.