Boost Your Car’s Mileage This Summer : कार खरेदी करताना कारची किंमत जेवढी महत्त्वाची असते तितका कारचा मायलेज महत्त्वाचा असतो. एखादे वाहन एक लिटर इंधनात किती अंतर कापते, ते अंतर म्हणजे त्या गाडीचा मायलेज असतो. मायलेज चांगला नसेल तर इंधनावर जास्त खर्च होतो. गाडी खरेदी करताना अनेक जण किंमत आणि मायलेजची तुलना करतात. कमी किंमतीमध्ये चांगली मायलेज देणारी कार मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

अनेकदा कंपनीच्या खोट्या दाव्यांमुळे ग्राहकांची मायलेजबाबत फसवणूक होते. आता उन्हाळा सुरू होत आहे. अशात आज आपण अशा टिप्स जाणून घेणार आहोत, या टिप्सच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा तुमच्या कारपासून चांगला मायलेज मिळवू शकता. (How to Increase Car Mileage in Summer Tips to Remember for Good Mileage)

टायर्स एअर प्रेशरची घ्या काळजी – मायलेजच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदा तुमच्या कारच्या सर्व टायरमधील हवा तपासली पाहिजे. यामुळे टायरमधीव हवा कमी आहे की नाही, हे कळू शकेल. टायरमध्ये कमी हवा असल्याने टायर आणि इंजिन दोन्हीवर दबाव येतो ज्यामुळे इंधनाचा अतिवापर होतो.

एसीचा असा वापर करा – कारमध्ये एसी चालवताना काळजी घ्या की कारची खिडकी खाली करू नये. यामुळे गाडीतून हवा निघून बाहेरची हवा आत येईल. त्यामुळे गाडी थंड होण्यासाठी एसीवर जास्त दबाव येतो आणि त्यामुळे इंधनाचा गरजेपेक्षा जास्त वापर होतो.

गीअर्स बदलताना काळजी घ्या – जर तुम्ही मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर वेळोवेळी गीअर्स बदलत राहा. कारण एकाच गीअरमध्ये स्पीड वाढल्याने इंजिनवर दबाव येतो. जास्त इंधनाचा अतिवापर होतो. याशिवाय ट्रॅफिकमध्ये गिअरची काळजी घ्या. गरज असेल तेव्हाच गिअर बदला.

ॲक्सेसरीज लावणे टाळा – अनेकदा लोक कारमध्ये गरज नसतानाही ॲक्सेसरीज वापरतात, त्यामुळे इंजिनवर जास्त भार पडतो आणि मायलेजही कमी होतो. त्यामुळे ज्या गोष्टींची खरंच गरज आहे, त्याच गोष्टींचा कारमध्ये वापर करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक ॲक्सेसरीजचा वापर करणे टाळा.

Story img Loader