How To Increase Mileage of Bike : दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहे. पूर्वी ६० किंवा ७० रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळायचे आता मात्र पेट्रोलची किंमत ९० च्या वर पोहचली आहे. अशात प्रत्येकाला वाटते की त्यांच्या दुचाकीने जास्त मायलेज द्यावा. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या दुचाकीचे मायलेज वाढवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेळेवर सर्व्हिसिंग करा

दुचाकी चांगली चालावी यासाठी दुचाकीची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळेवर दुचाकीची सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. यामुळे वाहनाच्या इंधनामध्ये सुधारणा दिसून येते. सर्व्हिसिंगमुळे दुचाकी चांगले काम करते.

टायरमध्ये एअर प्रेशर नीट ठेवा

दुचाकीचे मायलेज वाढवायचे असेल तर टायरमध्ये योग्य एअर प्रेशर ठेवणे आवश्यक आहे. योग्य एअर प्रेशर असल्यामुळे तुमच्या दुचाकीचे टायर जास्त दिवस टिकणार पण त्याच बरोबर दुचाकीचे मायलेज सुद्धा सुधारेल.

हेही वाचा : नवीन कार घेण्याचा विचार करताय? मग, या महिन्यात मार्केटमध्ये BMW सह ‘या’ आलिशान कार होणार लाँच

इंजिन सुरू ठेवू नका

जेव्हा तुमची दुचाकी एका जागेवर उभी आहे तेव्हा इंजिन सुरू ठेवू नका. यामुळे पेट्रोल वाया जाते. जर तुम्ही कोणाची वाट बघत असाल तर दुचाकीचे इंजिन बंद ठेवा.

क्लच ओवरराइडपासून वाचवा

दुचाकी चालवताना क्लचचा जास्त वापर करू नका. अनेक जण दुचाकी चालवताना थोडा क्लच दाबून ठेवतात. असे केल्याने दुचाकीच्या मायलेजवर त्याचा परिणाम होतो. ट्रॅफिकमध्ये असताना मोठ्या गिअरचा वापर करून क्लच ओव्हरराइडपासून तुम्ही वाचवू शकता.

इंजिनवर जास्त दबाव देऊ नका

दुचाकी चालवताना इंजिनवर जास्त दबाव देऊ नका. तुम्ही जितके जास्त इंजिनवर जोर देता, तितके जास्त पेट्रोल खर्च होते. जास्त वेगाने दुचाकी चालवल्याने आपल्या जीवाला धोका असतोच पण त्याचबरोबर इंधन सुद्धा वाया जाते.

चांगल्या गुणवत्तेचे इंधन वापरा

जर तुम्ही चांगल्या गुणवत्तेचे इंधन वापरत नाही तर तुम्हाला पाहिजे तितका जास्त मायलेज मिळणार नाही. त्याचबरोबर याचा थेट परिणाम तुमच्या इंजिनवर दिसून येईल. चांगल्या गुणवत्तेचे इंधन तुमच्या इंजिनची वैधता वाढवणार पण त्याचबरोबर दुचाकीचा मायलेज सुद्धा वाढवतील.

ट्रॅफिकपासून वाचा

प्रत्येकवेळी ट्रफिकपासून आपण वाचू शकत नाही. पण ट्रॅफिकमध्ये सर्वात जास्त इंधन खर्च होते. जर तुम्ही दररोज एकाच ठिकाणी जात असाल तर असे रस्ते शोधा जिथे कमी ट्रॅफिक लागेल.

पेट्रोलची टँक वेळोवेळी स्वच्छ करा

आताचे इंधन पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ असते. पण तरीसुद्धा कालांतराने इंधनाच्या टँकमध्ये कचरा जमा होतो ज्यामुळे इंधन इंजिनपर्यंत पोहचण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे इंधनाचा पाइप आणि टँक नियमित स्वच्छ ठेवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to increase mileage of bike follow tips you can save more money ndj
Show comments