मुंबईतील वसईमध्ये इलेक्ट्रिक स्कुटरची बॅटरी चार्ज होत असताना तिच्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शाहनवाझ अन्सारी यांच्या ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बॅटरी अधिक गरम झाल्याने ती फुटली असावी, असा अंदाज मानिकपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानंतर इलेक्ट्रिक स्कुटरबाबात लोकांच्या मनात भितीचे वातवरण पसरले आहे. दरम्यान बॅटरीत स्फोट झाल्याची ही पहिलीच वेळ नसून या आधी देखील अशी घटना घडली आहे. त्यामुळे बॅटरी कशी सुरक्षित ठेवावी याबाबत आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) बॅटरीमध्ये बिघाड असल्यास तुरंत दाखवा

जर बॅटरीचे केसिंग खराब झाले असेल आणि पाणी आत घुसत असल्याचे दिसत असेल, तर बॅटरी वेगळ्या ठिकाणी ठेवा आणि डिलरशी संपर्क साधा. खराब झालेली बॅटरी वापरू नका. ती धोकादायक ठरू शकते.

(देशभरात हिरोपेक्षा ‘या’ कंपनीच्या दुचाकीची नोंदनी अधिक, हिरोला पछाडल्याची पहिलीच वेळ)

२) स्कुटर वापरल्यानंतर लगेच चार्जिंग करू नका

इलेक्ट्रिक स्कुटर वापरल्यानंतर एक तासाच्या आत त्यास चार्ज करू नका. वाहन वापरल्यानंतर त्यास थंडे होऊ द्या. नंतर चार्जिंग करा.

३) इलेक्ट्रिक वाहनाचे मूळ चार्जर वापरा

चार्जर हारपल्यास किंवा बिघाड झाल्यास दुसऱ्या चार्जरने चार्ज करणे बॅटरीसाठी धोकादायक ठरू शकते. वाहनाची बॅटरी चार्ज करण्यासाठी वाहनासोबत देण्यात आलेले मूळ चार्जर वापरा. दुसरे चार्जर वापरू नका.

(अबब.. कार ११ लाखांची अन दुरुस्ती किंमत चक्क २२ लाख, कंपनीच्या अंदाजी खर्चाने ग्राहक हैराण)

४) तीव्र तापमानापासून बॅटरीची सुरक्षा करा

तीव्र तापमानापासून तुमच्या वाहनाचे रक्षण करा. उन्हात अधिक काळ इलेक्ट्रिक स्कुटर उभी ठेवू नका. याने स्कुटर गरम होणार नाही. तसेच बॅटरी देखील सुरक्षित राहील.

५) फास्ट चार्जिंग टाळा

इलेक्ट्रिक वाहन चार्ज व्हायला भरपूर वेळ घेते. त्यामुळे तेवढ्या वेळ थांबणे शक्य नसल्याने फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञान पुढे आले. मात्र याने देखील बॅटरीला नुकसान होऊ शकते. फास्ट चार्जिंग वाहन लवकर चार्ज करेल, या आशेने ती केली जाते. मात्र यामुळे बॅटरीवर ताण पडतो आणि ती कमकुवत होते आणि तिला आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फास्ट चार्जिंग टाळली पाहिजे.