How To Keep Rats Away From Cars : पावसाळा केवळ पाऊसच आणत नाही तर त्याच्यासोबत काही समस्याही येतो. पावसाळ्यात कार चालकांना रस्त्यावर पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागतेच पण या काळात कारमध्ये उंदीर घुसण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. कारचे वायरिंग आणि इतर भाग कुरतडल्याचे समोर येते.
जर तुम्हालाही तुमच्या कारमध्ये उंदीर येण्याची भीती वाटत असेल किंवा तुमच्या कारमध्ये उंदीर येण्यापासून रोखू इच्छित असाल तर येथे जाणून घ्या. तुमच्या कारमध्ये उंदीर घुसण्याची कारणे आणि ते टाळण्यासाठी नेमके काय उपाय आहेत हे जाणून घ्या
पावसाळ्यात कारमध्ये उंदरांची घुसखोरी होण्याचे कारण पावसाळ्यात पाऊस पडला की, अनेक ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे जमिनीत बिळात राहणारे उंदीर जगण्यासाठी सुरक्षित जागा शोधतात. अशा परिस्थितीत जिथे राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळते तिथे उंदीर लपतात. अनेकदा उंदीर कारमध्ये घुसतात वायरिंगसह अनेक गोष्टींचे मोठे नुकसान करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा