Car AC in Summer : सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळ्यात कारमधील एसी योग्यरित्या काम करत आहे की नाही, हे तपासणे महत्वाचे आहे. आपण उन्हाळ्यात जेव्हा वाहतुक कोंडीमध्ये अडकतो तेव्हा एसी उन्हाचा तडाका सहन करू शकत नाही. काही वेळा एसी खराब होतो. पण आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कारचा एसी व्यवस्थित ठेवता येईल.

नियमित एसी वापरा

अनेक भारतीय कारचा एसी नियमित वापरत नाही. त्यांना असं वाटतं की खूप जास्त वेळ एसी लावल्याने खूप जास्त इंधन खर्च होते, पण हे चुकीचं आहे. नियमित एसी वापरून तुम्ही सर्व पार्ट तपासू शकता. जर एखादा पार्ट खराब झाला तर तुम्ही लगेच दुरूस्त करू शकता.
आठवड्यातून १० मिनिटांसाठी डिफ्रॉस्ट मोडमध्ये कुलेस्ट सेंटिग्ज आणि जास्त फॅनचा स्पीड करून एसी सुरू करावा. यामुळे गॅस प्रेशर नीट राहते, कंप्रेसर नीट चालते आणि कारमधील दमटपणा दूर होतो.

एअर फिल्टर बदला किंवा स्वच्छ करा

कारचे एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यासाठी बाहेर काढता तेव्हा त्यात घाण किंवा धूळ जमा झालेली दिसून येते. हे फिल्टर विशेषत: डॅशबोर्डच्या खाली असते आणि सामान्य सर्व्हिस चेकअप दरम्यान वेळोवेळी व्हॅक्युम क्लिनर वापरले जाते पण तरीसुद्धा हे स्वच्छ होत नसेल तर एअर फिल्टर बदलून नवीन एअर फिल्टर लावणे गरजेचे आहे.

कारला आधीच थंड करू नका

अनेक जण कारला आधीच थंड करतात पण हे योग्य नाही. जेव्हा कार चालविली जाते तेव्हा त्याची एअर कंडिशनिंग सिस्टिम जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कार्य करते. उन्हाळ्यात कार पार्क करताना ती गरम होते अशावेळी गाडी चालवताना पंखा उंचावर चालू करा आणि गरम हवा बाहेर पडण्यासाठी फक्त १० ते २० सेकंदासाठी सीटजवळची खिडकी उघडा.

रिसरक्युलेशन मोडमध्ये एसी वापरणे टाळा

कारच्या मागच्या बाजूला कोणी बसलेले असेल तर रिसरक्युलेशन मोडमध्ये एसी वापरणे टाळा.
रिसरक्युलेशन मोड वाहनाच्या पुढील भागातून हवा बाहेर काढतो आणि ती पुन्हा थंड करतो, जे गाडीमध्ये पुढे बसलेल्या प्रवाशांसाठी चांगले असते पण मागच्या बाजूला गरम हवा सोडते.

कार स्वच्छ ठेवा

कार, विशेषत: कारचा आतील भाग नीट स्वच्छ ठेवणे हे कारसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारमधील घाण आणि बॅक्टेरियामुळे कारचा एसी खराब होऊ शकतो. कार नियमितपणे व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.

Story img Loader