Car Parking Crash Video: सगळ्यात दुर्लक्षित ड्रायव्हिंग स्किल काय आहे? तर गर्दीच्या रस्त्यावर समांतर पार्क करण्याची क्षमता, असं अनेकांचं म्हणण असेल. परंतु खरं सांगायचं झालं, तर फक्त ‘पार्किंग’ हेच मूळ ड्रायव्हिंग स्किल आहे. सुमारे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात, स्क्रॅच-फ्री कार पाहणं हे युनिकॉर्न शोधण्याइतके दुर्मीळ आहे. अशा सगळ्या घटनांपासून शिकून आपलं कौशल्य वाढवण्याऐवजी आपण फक्त म्हणतो की, असं तर नेहमीच घडत राहतं. पण, कदाचित यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. विशेषत: नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर असे कळले की, अतिशय योग्य रीतीनं पार्किंग करणं ही एक सुपरपॉवर ठरू शकते.

… म्हणून पार्किंग कौशल्य महत्त्वाचे

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पार्किंग स्किल नसल्यानं कसा मोठा अपघात झाला हे कळून येतं. निखिल राणा यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये, एका सेडान ड्रायव्हरने ब्रेक न लावता पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या चुकीमुळे कार पहिल्या मजल्यावरील पार्किंगची भिंत फोडत खाली तळमजल्यावर येऊन कोसळली. सुदैवानं कारच्या या दुर्घटनेमुळे खाली असणाऱ्या कोणालाही दुखापत झाली नाही. कार क्रॅश झाल्यानंतर मागे बसलेला प्रवासी बाहेर निघण्यात यशस्वी झाला. कारण- सेडानच्या बूटने सगळा धक्का सहन केला.

Monalisa Marathi News
Monalisa : मोनालिसाचा आरोप, “काही लोक फोटो काढण्यासाठी सक्तीने तंबूत आले आणि माझ्या भावाला…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Retired Soldier Kills Wife, Disposes of Body Parts in Hyderabad Lake
Crime News : याला माणूस तरी कसं म्हणावं? पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, निवृत्त जवानाचे क्रूर कृत्य
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला असता तर…
Elon Musk and Sam Altman in conflict over the $500 billion AI project announced by Donald Trump.
Donald Trump : “त्यांच्याकडे पैसेच नाहीत”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच मोठ्या घोषणेची Elon Musk यांनी उडवली खिल्ली
Pune Crime News
Pune Crime : “कात्री खुपसून पत्नीची हत्या करत पतीने व्हिडीओ शूट केला, आणि…”; पोलिसांनी सांगितला खराडीतील घटनेचा तपशील
Father of Saif stabbing accused speaks about missing legal documents after the incident.
Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यानंतर हल्लेखोराचा पहिला फोन कोणाला? वडील म्हणाले, “आमचा मुलगा असा…”

पार्किंग तंत्रज्ञानावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका

आधुनिक गाड्या हाय-टेक गॅजेट्सने भरलेल्या असतात, जसे की रिव्हर्स कॅमेरा, ३६० डिग्री कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्स. हे गॅजेट्स तुमच्या वैयक्तिक पार्किंग असिस्टंटसारखे आहेत; पण लक्षात ठेवा- तंत्रज्ञानावर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. पार्किंग करण्यापूर्वी जुने साधे उपाय वापरायला विसरू नका— ते म्हणजे, तुमचे साइड मिरर्स, रिव्हर मिरर आणि सामान्य ज्ञान.

खरं सांगायचं झालं तर कोणतंही तंत्रज्ञान आपला आत्मविश्वास नष्ट करू शकत नाही. अनेकदा कोणाचीही मदत न घेता, कित्येक लोक गाडी अगदी योग्य प्रकारे पार्क करतात. या सगळ्यामागचा धडा काय? जर तुम्हाला तुमचा स्वतःचा स्टंट व्हिडीओ पुन्हा तयार करायचा नसेल, तर गाडी काळजीपूर्वक आणि जागरूकतेनं पार्क करा.

Story img Loader