why renewing car insurance on time is crucial : मोटर वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत, भारतात कार विमा पॉलिसी (Car Insurance policy) गरजेचे आहे. ॲक्टिव्ह विमा पॉलिसीशिवाय वाहन चालविणे केवळ बेकायदाच नाही, तर धोकादायकसुद्धा आहे. पण, असे दिसून आले आहे की, अनेक कारमालक त्यांच्या विमा पॉलिसी (कार इन्शुरन्स) रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष करतात. तुमच्या कारचा विमा रिन्यू करण्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, जे दंड भरण्यापलीकडेसुद्धा जाऊ शकतात.

कार इन्शुरन्स रिन्यू (Car Insurance policy) करणे महत्त्वाचे का?

कार इन्शुरन्स पॉलिसी (Car Insurance policy) जर रिन्यू केली नसेल, तर तुम्ही बेकायदा वाहन चालवीत आहात. कारण- सप्टेंबर २०१८ पासून थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आलं आहे. वाहनचालकांनी कारसाठी तीन वर्षांचे आणि दुचाकीसाठी पाच वर्षांचे थर्ड पार्टी कव्हर आठवणीने घ्यावे तर थर्ड पार्टी विमा वेगळा घ्यावा लागतो हे लक्षात ठेवा. भारतात रस्त्यावरील प्रत्येक वाहनाला किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. जर तुमचा विमा संपला असेल, तर तुम्हाला दंडासह कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते.

आर्थिक उत्तरदायित्व (फायनान्शियल लायबिलिटी) :

जर तुम्ही कारचा विमा रिन्यू केला नसेल, आणि वाहन चालविताना तुमचा अपघात झाला, तर सर्व खर्चासाठी तुम्ही जबाबदार असाल. यामध्ये तुमच्या वाहनाच्या दुरुस्ती खर्च, थर्ड पार्टी वाहनांना किंवा मालमत्तेला झालेल्या कोणत्याही हानीचा समावेश असेल.

कव्हरेज नाही :

कार विमा पॉलिसी अपघात, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा आगीमुळे तुमच्या वाहनाच्या नुकसानीसाठी कव्हरेज प्रदान करते. तुमची पॉलिसी लॅप्स झाल्यावर हे सर्व फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. जेव्हा तुम्ही कार इन्शुरन्स रिन्यू करीत नाही, त्या कालावधीत होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जाणार नाही; ज्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा…मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?

नो-क्लेम बोनस :

कार विमा कव्हरेज ((Car Insurance policy) ठेवण्याचे एक महत्त्वाचा फायदा म्हणजे नो-क्लेम बोनस (NCB) जमा करणे. NCB म्हणजे विमा कंपन्यांकडून मिळणारी सवलत, जी तुम्ही वर्षभर एकही दावा करीत नाही, त्या वेळी मिळते. त्यामुळे तुमच्या प्रीमियम खर्चात लक्षणीय कपात होते. जर तुम्हाला कार इन्शुरन्स रिन्यू करण्यासाठी ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला, तर तुम्हाला तुमचा NCB गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला पॉलिसी रिन्यू करताना अधिक प्रमाणात प्रीमियम भरावे लागतील. त्यामुळे विमा कव्हरेज सतत रिन्यू करणे महत्त्वाचे आहे.

हायर रिन्युअल प्रीमियम्स :

विमा कंपन्या लॅप्स झालेल्या पॉलिसींकडे उच्च जोखीम म्हणून पाहतात. याचा अर्थ जेव्हा तुम्ही त्यांचे नूतनीकरण कराल, तेव्हा तुमचा प्रीमियम वाढू शकतो. त्याव्यतिरिक्त तुमच्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यापूर्वी तुम्हाला वाहन तपासणी करावी लागेल; ज्यामुळे खर्च वाढेल. पॉलिसीच्या नूतनीकरणात विलंब झाल्यामुळे प्रक्रियेचा कालावधी जास्त होऊ शकतो.

कायदेशीर समस्या :

थर्ड पार्टी इन्शुरन्सचा समावेश असलेल्या विमा जर तुम्ही रिन्यू केला नसेल आणि तुमच्याकडे अपघातादरम्यान कोणी जखमी झाले असेल किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले, तर पीडित व्यक्ती तुमच्याविरुद्ध खटला दाखल करू शकते. विम्याशिवाय तुम्हाला कायदेशीर शुल्क आणि भरपाई द्यावी लागेल.

पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी मर्यादित पर्याय :

एकदा पॉलिसी संपली की, तुम्ही अतिरिक्त औपचारिकता पार न करता, त्याचे त्वरित नूतनीकरण करू शकणार नाही. काही विमा प्रदात्यांकडे तुम्हाला जुन्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्याऐवजी नवीन पॉलिसी खरेदी करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन पॉलिसी प्रभावी होण्यापूर्वी उच्च प्रीमियम, मर्यादित कव्हरेज पर्याय आणि संभाव्य प्रतीक्षा कालावधी मिळू शकतात.

तुमचा कार इन्शुरन्स लॅप्स (Car Insurance policy) होण्यापासून कसा रोखायचा?

१. एक्सेपायरी डेट रिमाइंडर : विमा पॉलिसी रद्द होऊ नये यासाठी तुमच्या फोनवर एक्सेपायरी डेट रिमाइंडर सेट करा.

२. लवकर रिन्युअल करणे : बहुतेक विमाकर्ते तुम्हाला तुमची पॉलिसी कालबाह्य तारखेच्या ३० दिवस आधी नूतनीकरण करण्याची परवानगी देतात. त्याचबरोबर तुम्हाला विविध इन्शुरन्सची तुलना करण्यासाठी सर्वोत्तम इन्शुरन्स निवडण्यासाठी वेळही मिळतो.

३. ऑटो-रिन्युअल पर्याय : काही विमाकर्ते ऑटो-रिन्युअल सेवा देतात जेथे प्रीमियम आपल्या खात्यातून ऑटोमॅटिकली डेबिट केला जातो. त्यामुळे तुमची पॉलिसी वा इन्शुरन्स नेहमी अॅक्टिव्ह राहतो.

४. इन्शुरन्स ॲप्स इन्स्टॉल करा : अनेक विमा प्रदात्यांकडे ॲप्स आहेत, जे नियमित नोटिफिकेशन्स पाठवितात. हे ॲप्स डाउनलोड केल्याने नूतनीकरण प्रक्रिया आणखीन सोपी होऊ शकते.