Holi 2024 car care : ‘बुरा ना मानो….. होली है!’ असे म्हणून आपण होळीच्या दिवशी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने एकमेकांना रंग लावतो, रंग खेळतो. मोठमोठ्या सोसायट्यांमध्येही होळी-रंगपंचमीचे आयोजन केले जाते. मित्र-परिवारासह मनसोक्त होळी खेळताना हाताचा किंवा हवेत उडवलेले रंग सर्वत्र लागतात. अशामध्ये उघड्यावर पार्क केलेल्या गाड्या वा पार्किंगमधील गाड्यांना रंगाचे डाग लागण्याची सर्वाधिक शक्यता असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुमच्या गाड्या, विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गाडीला रंगीत असेल होऊ द्यायचे नसेल, तर काय काही सोप्या मात्र तेवढ्याच उपयुक्त अशा टिप्स हिंदुस्थान टाइम्सने दिल्या असल्याचे त्यांच्या एका लेखावरून समजते. नेमके या टिप्स काय आहेत आणि त्यांचा उपयोग कसा करायचा ते पाहा.

हेही वाचा : Car tips : नवीन गाडी घेतल्यावर ‘या’ चुका करू नका! वाहनाची काळजी कशी घ्यावी पाहा

वाहनाला होळीच्या रंगांपासून कसे वाचवावे ते पाहा :

१. गाडीला कव्हर घालावे

दुचाकी किंवा चार वाहनांना धूळ किंवा इतर गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गाडीचे कव्हर मिळते. अनेकदा असे कव्हर गाडीसह मिळते. जेव्हा होळी असेल त्याआधी तुमच्या गाडीवर, वाहनाला वरपासून खालपर्यंत झाकून ठेवणारे कव्हर घालून घ्यावे. तुमच्याकडे कव्हर नसल्यास एखाद्या बंद गॅरेजमध्ये गाडी लावून ठेवावी. मात्र, होळीच्या दिवशी वाहने चुकूनही उघड्यावर लावून ठेवू नका.

२. गाडीवर वॅक्स किंवा पॉलिशचा वापर करावा

होळीच्या दिवशी तुम्हाला घराबाहेर पडणे अगदी गरजेचे असेल, तर काय करावे? तर वाहनाचे रंगापासून रक्षण व्हावे यासाठी गाडीवर वॅक्स किंवा पॉलिशचा वापर करावा. अथवा टेफ्लॉनचा एक लेअर/थर गाडीवर लावून घ्यावा. त्यामुळे तुमच्या वाहनावर रंगाचे डाग राहण्याचा धोका कमी होतो. मात्र, वॅक्स किंवा कोणतेही पॉलिश लावण्याआधी गाडी स्वच्छ धुऊन घ्यावी.

हेही वाचा : Car tips : दुर्गंधी, घाण वास दूर करतील कॉफीच्या बिया; पाहा सुगंधी गाडीसाठी ‘स्वस्तात मस्त’ अशा टिप्स….

३. खिडक्यांच्या काचा बंद ठेवणे

होळीदरम्यान स्वतःच्या गाडीतून प्रवास करीत असल्यास गाडीच्या काचा बंद करून ठेवा. चुकून होळीचे रंग किंवा रंगाने पाणी गाडीच्या आत आले, तर गाडीमधील सीट किंवा इतर यंत्र खराब होण्याची शक्यता अधिक असते. जर चुकून गाडीच्या आतील गोष्टींमध्ये बिघाड झाला, त्या खराब झाल्या, तर त्यांना दुरुस्त करून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते; तसेच ते काम खर्चीक पडू शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी गाडी घेऊन घराबाहेर पडताना गाडीच्या काचा अवश्य बंद करून ठेवा.

४. कॅब बुक करणे

होळीच्या सणानिमित्त अनेक जण नातेवाइकांना भेटण्यासाठी बाहेर जात असतात. अशात तुमच्या वाहनांची काळजी घेण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे तुम्हाला जिथे जायचे असेल, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कॅब किंवा टॅक्सी बुक करावी. त्यामुळे तुमचा प्रवास सोईचा तर होईलच, तसेच रस्त्यावर खेळल्या जाणाऱ्या रंगांमुळे तुमची गाडी खराब होण्याची चिंता नसेल.

अशा या चार आणि काही सोप्या युक्त्या वापरून तुम्ही होळीच्या दिवशी तुमच्या गाडीचे रंगांपासून रक्षण करू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect vehicle from holi colors during the festival check out these four simple tips dha