How To Stop Dogs Chasing Your Bike During Night: अनेकवेळा गाडीवर जाताना रस्त्याच्या कडेला कुत्री (Dog) दिसतात. काही वेळा तर ती गाडीच्या मागे भुंकत पळतातही. कुत्रे गाडीच्या मागे लागत असल्याने अनेकदा आपली अशी घाबरगुंडी उडते. गाडीच्या मागे लागलेले कुत्रे भुंकून भुंकून अंगावर येतील आणि त्यांच्या कचाट्यात सापडलो तर ते चावतील की काय इतके ते आक्रमक दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंबहुना रात्रीच्या वेळी अनेक कुत्रे आपल्या जवळून वाहन जाताना दिसले की ते भुंकायला लागतात. कार मालकांना याचा फारसा त्रास होणार नाही, परंतु दुचाकी मालक घाबरू शकतात, कारण त्यांना कुत्रे चावतात. तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जात असताना अनेकदा असं होते की, कुत्री तुमच्या गाडीच्या मागे धावतात. जोरजोराने भुंकतात. अशावेळी अनेकदा चालकाचं नियंत्रण सुटण्याची शक्यता असते किंवा कुत्रं भुंकल्याने चालकाचे लक्षही विचलित होण्याची शक्यता असते. यामुळे अपघातदेखील होऊ शकतो. असं होऊ नये, यासाठी काय करावं? चला तर आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही स्वतःचा बचाव करु शकता…

रात्रीच्या वेळी कुत्रे वाहनांवर का भुंकतात? वास्तविक, कुत्र्यांना त्यांच्या जवळ वाहन भरधाव येताना दिसले की ते भडकतात. यामुळे ते भुंकायला लागतात आणि चावायला धावू लागतात.

(हे ही वाचा: गाडीच्या मागे कुत्रे का धावतात आणि भुंकतात माहितेय का? यामागचे कारण जाणून थक्क व्हाल )

कुत्रे चालत्या गाड्यांचा पाठलाग करतात किंवा भुंकतात, कसे थांबवायचे?

  • त्यामुळे, रात्रीच्या वेळी तुमच्या वाहनावर कुत्र्यांनी भुंकावे असे तुम्हाला वाटत नसेल, तर यावरचा सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या वाहनाचा वेग कमी करा. गाडी चालवत असताना कुत्रे मागे लागल्यास गाडीची गती कमी करावी..आपण जर गाडीची गती वाढवली असता अपघात होण्याचा धोका असतो…कुत्र्याची एक सिमा असते..त्याच्या सिमेमध्ये गेल्यानंतर तो पाठलाग सुरु करतो..पण त्याला घाबरु नये..
  • संथ गतीने चालत असाल तर कुत्रा भुंकणार नाही अशी दाट शक्यता असते. मात्र, वाहनाचा वेग कमी असतानाही कुत्रा भुंकत असेल, तर घाबरू नका, त्यांना थोडे घाबरवण्याचा प्रयत्न करा आणि तिथून निघून जा.
  • अनेकदा तुम्ही बाईकची गती कमी करूनही कुत्रा तुमच्या मागे धावत असेल तर बाईक थांबवा, मग कुत्रा देखील थांबेल. त्यानंतर अगदी धिम्या गतीने तुम्ही तिथून निघून जाऊ शकता. 
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to stop dog chasing your bike in night follow the tips given below dogs will not run after your bike pdb
Show comments